Add

Add

0
             पालिकेतील उत्तम कामगिरी पुणेकरांपुढे मांडा :शरद पवार यांचे आवाहन 
पुणे (प्रतिनिधी) :-'राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगरसेवकांनी 5 वर्षे उत्तम कामगिरी केली असून पुणेकर नागरिकांसमोर ही  कामगिरी मांडावी ,आपण सगळेच उमेदवार आहोत असे मानून सर्वानी निवडणुकीचे काम करावे ' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले 
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘सक्षम’-उमेदवार प्रशिक्षण’ कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्र मातंर्गत इच्छुक  उमेदवारांसाठी दिनांक 4 व 5 डिसेंबर 2016 रोजी प्रशिक्षण शिबीराचे सकाळी माजी उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी उदघाटन केले. 
खासदार वंदना वंदना चव्हाण ,महापौर प्रशांत जगताप ,प्रवक्ते अंकुश काकडे ,माजी आमदार कमल ढोले -पाटील,रवींद्र माळवदकर ,प्रवक्ते म वि अकोलकर आदी मान्यवर उपस्थित होते . अशोक राठी यांनी सूत्रसंचालन केले . रुपाली चाकणकर यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला  . एड . वंदना चव्हाण यांनी  शिबिराचा हेतू स्पष्ट केला .
या शिबिरामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  उमेदवारांना मार्गदर्शन केले. . हे शिबिर सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत, सावित्रीबाई फुले सभागृह, महात्मा फुले पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
शरद पवार यांनी वाढत्या शहरीकरणाकडे लक्ष वेधले . वाहतूक सुविधेसह नागरी जीवन सुसह्य करण्यामागची संकल्पना मांडली . स्वस्त घरे ,ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न,झोपड्पट्टीधारकांचे प्रश्न याकडे लक्ष वेधून अशा समस्यांवर काम करणाऱ्या संस्थाही तयार व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली विकासाच्या दृष्टीने राजकारण मध्ये न आणता काम केले पाहिजे. पुण्याची ओळख गुंतवणूक आणि रोजगारासाठी होत असताना त्याला अनुरूप धोरणे राज्य सरकारने आखायला हवीत ' असेही शरद पवार यांनी  सांगितले 
'50 टक्के आरक्षण दिल्यानंतर राजकारणात महिलांचा  आहे आणि त्या चांगले काम करीत आहेत असे ही  शरद पवार यांनी  सांगितले ' निवडणूक कशी लढवावी ,हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही ,कायद्याच्या चौक टीत राहून निवडणूक लढा . राज्यकर्ता उत्तम असला की कारभाराचा गाडा उत्तम चालतो . नागरी जीवन सुसह्य करण्यासाठी आपण सर्वानी कार्यरत राहावे ' असे ते म्हणाले 
नोटबंदीच्या व्यवस्थापनावर त्यांनी टीका केली .सर्वसामान्यांना यातना होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली . 
स्मार्ट सिटी हे आभासी चित्र :अजित पवार यांचा  हल्ला   
. या शिबिरात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित  पवार म्हणाले की काळा पैसा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दुमत नाही. पण या निर्णयामुळे गोरगरिबांचे जे हाल होत आहेत, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आवाज उठविला पाहिजे. या पार्श्वभूमीवर ठोस व निश्चित उपाय योजना न करता लोकांशी भावनिक खेळ चालला आहे. अशावेळी सर्व कार्यकर्त्यांनी लोकांच्या सहाय्यासाठी उभे राहिले पाहिजे. स्मार्ट सिटी म्हणजे नेमके काय हे अजून केंद्र व राज्य सरकार सांगू शकले नाही. स्मार्ट सिटीतून केवळ एकाच भागाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरूआहे. केवळ आभासी चित्र तयार केले जात असून कृतीशून्य आहे हे पुणेकरांना दाखवून द्यायला हवे. मेट्रो, छत्रपती शिवाजी स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा नुसत्याच घोषणा झाल्या आहेत. 
 पाणी व पुण्याच्या कचरा प्रश्नी सरकार हेतूपुरस्सर विलंब करत आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांनी प्रत्येक वॉर्डात, प्रभागात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास उभे राहिले पाहिजे. विकासाच्या नावाखाली सरकारची ही फसवी धोरणे आपण पुणेकरांच्या लक्षात आणून द्यायला हवीत.बीआरटी, पुण्यातील रस्ते, उड्डाणपूल यातील त्रुटी दूर करून पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचे काम आपण हाती घेतले आहे व वेगाने सुरू आहे. पुणेकरांसाठी 'जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणणे' हीच राष्ट्रवादीची वृत्ती आहे.पुण्याला जुने वैभव मिळवून देताना काळानुरूप कॉस्मोपॉलिटन होऊ पाहणार्‍या पुण्याची सर्वोतपरी काळजी घेणं ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची व पक्षाची प्रमुख जबाबदारी आहे.औट घटकेचे राजकारण  राष्ट्रवादीने कधीही केले नाही पुढील 20 ते 25 वर्षांचा अंदाज घेऊन काम केले आहे. पर्यावरणाला राष्ट्रवादीने प्राधान्य दिले आहे. 
पुण्याला शुद्ध हवेचे वैभव परत मिळाले पाहिजे :अरुण फिरोदिया 
उद्योजक अरुण फिरोदिया यांनी 'नागरीकरणावर ' मार्गदर्शन केले . पर्यावरण रक्षण कायद्यांतर्गत महापौर ,आयुक्त खूप काम करू शकतात ,पुण्याला शुद्ध हवेचे वैभव परत मिळाले पाहिजे . विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले पाहिजे ,सायकल ट्रॅक ची अंमलबजावणी झाली पाहिजे ,प्रत्यकाने आठवड्याला काही तास वॉर्डात दिले पाहिजेत ,लोकशाहीवर विश्वास वाढवायचा असेल तर लोकसहभाग वाढवला पाहिजे अन्यथा हुकूमशाहीकडे वाटचाल होईल ',असे फिरोदिया यांनी सांगितले . 
 ,एड . नितीन देशपांडे यांनी 'पालिकेच्या संदर्भातील कायदे ',हर्षद अभ्यंकर -प्रांजली देशपांडे यांनी 'पुण्याची वाहतूक ' ,स्नेहा पळणिटकर यांनी 'कचरा व्यवस्थापनावर ' मार्गदर्शन केले . अशोक पिंगळे,अविनाश मधाळे यांनी 'शाश्वत विकासाची उद्दिष्टे ' या विषयावर मार्गदर्शन केले .  

Post a Comment

 
Top