Add

Add

0

आमदार मेधा कुलकर्णी यांचा सत्कार करताना सुनंदा जोरी,राजाभाऊ जोरी, भीमराव तापकीर आदी.
पुणे(प्रतिनिधी):-देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हे निर्णय विकासाला चालना देणारे असल्याचे मत आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 
भारतीय जनता पार्टीतर्फे कोथरूड डेपोजवळ लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता.त्याच्या बक्षीस वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार भीमराव तापकीर,अभिनेत्री श्‍वेता शिंदे,राज्य चिटणीस धीरज घाटे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे, अँड़ गणेश वर्पे,बाळा टेमकर, गोरख दगडे, वैभव मुरकुटे, उदय कड, किरण दगडे, प्रा. मनोहर बोधे उपस्थित होते. 
कुलकर्णी म्हणाल्या, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने विकासकामे जलदगतीने राबविण्यात येत आहेत. कोथरूड झपाट्याने विकसित होत आहे. या भागातील समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आमदार भीमराव तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी शहर उपाध्यक्ष राजाभाऊ जोरी, सुनंदा जोरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये हजारो महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी महिलांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

Post a Comment

 
Top