Add

Add

0


खडकवासला (दत्तात्रय नलावडे यांजकडून ):-पुणे जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराचा फटका जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यातील शालेय पोषण आहार योजनेत तुटपुंज्या मानधनावर, डोळ्यात तेल घालून काम करणार्‍या हजारो स्वयंपाकी व मदतनीस महिलांना बसला आहे. या महिलांना जवळपास पाच महिने मानधनच मिळालेले नाही. त्यामुळे ऐन नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या चलन तुटवड्यांच्या दिवसांत या महिलांना अत्यंत हाला खिला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र वेल्हे, मुळशी, भोर, पश्‍चिम हवेलीमध्ये आहे.  
 विद्यार्थ्यांस भाजीपाला, पूरक आहार व इंधन खर्चापोटी प्रत्येकी 1 रूपये 51 पैसे, तर 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थांस 2 रूपये 17 पैसे इतका खर्च दिला जात आहे. अन्न शिजविण्यासाठी 1 ते 25 विद्यार्थ्यांच्या मागे स्वयंपाकी महिलेस दरमहा एक हजार रूपये मानधन दिले जाते. त्यापुढे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार स्वयंपाकी व मदतनीस यांना प्रत्येकी एक हजार रूपयांचे मानधन दिले जात आहे. शालेय पोषण आहार मोजणीतील स्वयंपाकी महिला व मदतनीस यांच्या बँक खात्यावर त्यांचे मानधन जमा होणार आहे. मात्र स्वयंपाकी, मदनीस यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त खात्यावर खाते नसल्यास दुर्गम खेड्यातील स्वयंपाकी महिला व मदतनीस यांचे मानधन थकीत राहणार आहे. 
ऑनलाइन पद्धतीमुळे शालेय पोषण आहाराचे मानधन बिले देण्यास विलंब झाला आहे. हे मान्य करत येत्या चार-पाच दिवसांत संबंधित तालुका पंचायत समिती कार्यालयात रखडलेले मानधन व बिले पाठविली जाणार आहेेत, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून सांगण्यात आले. जिल्ह्यातील 1 ते 8 वी पर्यंतच्या 8 लाख 22 हजारांवर विद्यार्थ्यांच्या केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून शालेय पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. या निधीत केंद्र शासानाचा वाटा सर्वांत अधिक आहे. इयत्ता 1 ते 5 वी शालेय पोषण आहार योजनेत महत्त्वाचा कणा म्हणून खेड्यापाड्यातील महिला स्वयंपाकी, मदतनीस काम करत आहेत. डोंगराळ भागात महिला बचत गटाऐवजी महिलाच अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करत आहेत. अनेक ठिकाणी बचत गटाच्या नावाखाली व्यावसायिक पद्धतीने अन्न शिजवून वाटप केले जात आहे. या सर्वांचे मानधन दीर्घकाळ रखडले आहे. त्याचा परिणाम पोषण आहारावर झाला आहे. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक त्रस्त झाले आहे. यासाठी शिक्षक लक्ष देत असले, तरी मोठ्या विद्यालयात शिक्षक आहाराकडे पाहतही नसल्याने चित्र सिंहगड पश्‍चिम हवेलीतील शाळांत आहेत. 

Post a Comment

 
Top