Add

Add

0

बारामती (प्रतिनिधी):-पुणे जिल्ह्यात होणार्‍या नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजप मित्रपक्षांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीने लढणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात पाच ते सहा नगराध्यक्ष भाजप व मित्रपक्षांचे निवडून येतील. बारामतीसह जिल्ह्यातही परिवर्तन करून भाजप पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 


बारामती नगरपालिका निवडणुकीसंदर्भात बारामती विकास आघाडीच्या उमेदवारांची बैठक संपल्यानंतर बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बापट म्हणाले, राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर गेला आहे. या निवडणुकीत जवळपास 960 ते 970 ठिकाणी भाजप व मित्रपक्षांचे नगरसेवक निवडून आले आहेत. 
60 ते 65 ठिकाणी भाजप व मित्रपक्षांचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. पहिला टप्पा झाला, त्यावेळी भाजप पाचव्या क्रमांकावर होता, तो आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत आम्ही मित्रपक्ष व आघाडीला बरोबर घेऊन ताकदीने लढणार आहे. 
स्थानिक पातळीवरही परिवर्तनाची लाट आहे. ज्याप्रमाणे राज्यात परिवर्तन झाले, त्याप्रमाणे बारामतीसह जिल्ह्यातही परिवर्तन करून भाजप पहिल्या क्रमांकावर येईल, असा दावा बापट यांनी यावेळी केला.यावेळी माळेगाव कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे,माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे,पुणे प्रादेशिक बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे,सुनील पोटे, नाना सातव, अविनाश मोटे, अँड़ राजेंद्र काळे, यशपाल भोसले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ताकदीने प्रचारात उतरतील.आमच्यापुढे राष्ट्रवादीचे असलेले आव्हान आम्ही स्वीकारले असून, राष्ट्रवादी हाच आमचा क्रमांक एकचा शत्रू आहे.
                                                                                  - गिरीश बापट, पालकमंत्रीगिरीश बापट :

Post a Comment

 
Top