Add

Add

0
लायन्स क्लब ने युवा नेतृत्वाची नवी पिढी घडवावी :गिरीश बापट 
'लायन्स क्लब पुणे औंध - पाषाण' च्या अध्यक्षपदी डॉ. सतीश देसाई

पुणे (प्रतिनिधी):-'लायन्स क्लब ने समाजात सेवावृत्ती रुजविली आहे ,पुढील काळात युवा नेतृत्वघडणाची जबाबदारी लायन्स ने घ्यावी असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.राजकारण हे अळवावरचे पाणी असते,पान हलले कि पाण्याचे थेम्ब पटापट पडतात,समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राज कारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो 'असे ही ते म्हणाले
'लायन्स क्लब पुणे औंध - पाषाण' च्या अध्यक्षपदी डॉ. सतीश देसाई यांच्या आणि कार्यकारिणीतील सद स्यांच्या शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सायंकाळी घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे  करण्यात आले  होते . यावेळी प्रमुख पाहुणे या  नात्याने गिरीश बापट बोलत होते . 
लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी अध्यक्षस्थानी होते. उपप्रांतपाल रमेश शाह,मावळते अध्यक्ष डॉ प्रदीप दामले ,सचिव गणेश जाधव ,प्रदीप बर्गे ,गिरीश मालपाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते .गिरीश बापट म्हणाले ,'माणसातील मनुष्यत्व उभे करून दुसऱ्याला मदत करण्याची भावना ,संस्कार निर्माण करणे हे लायन्स चे यश आहे . लायन्स चे हे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे . युवा पिढीला मार्गदर्शनाची गरज असून लायन्स या पिढीतील नेतृत्व गुण शोधून त्यांना पुढील काळाचे नेतृत्व करण्यासाठी घडवावे '
राजकारण हे अळवावरचे पाणी असते,पान हलले कि पाण्याचे थेम्ब पटापट पडतात,म्हणून हा देश राज कारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो.समाजकारण हेच चिरकाल टिकते.राजकारणात निवडणुकीपूर्वी जोरात काम होते आणि निवडणुकीनंतर संपते . '
डॉ . सतीश देसाई या मित्रासाठी या पदग्रहण समारंभाला मी आलो .देसाई हे कल्पक नेतृत्व असून स्वतः काम करत करत दुसऱ्यांना कामाला लावण्याची कला त्यांच्याकडे आहे . असेही ते म्हणाले 
लायन मदनभाई सुरा यांच्या स्मरणार्थ 'लायनभूषण ' पुरस्कार सुरु केला जाणार असल्याची माहिती डॉ सतीश देसाई यांनी यावेळी दिली . लायन्स च्या नव्या शतकाची सुरुवात विविधअंगी समाजकार्याने केली जाणार आहे ,असेही त्यांनी सांगितले. 
सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले .दिलीप शेठ यांनी आभार मानले .सभागृहात यावेळी विनोद शाह ,कृष्णकांत कुदळे ,अंकुश काकडे ,अरुण शेवते ,प्रकाश देवळे ,मिलिंद जोशी ,रवी चौधरी ,सुरेश धर्मावत ,सचिन इटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते . 

Post a Comment

 
Top