Add

Add

0
मुंबई (प्रतिनिधी):-26 जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी कारगिल युद्धात हिंदुस्थानने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या शहिदांना मानवंदना देण्यात येणार आहे.

हिंदुस्थानी सैन्यामध्ये सामिल होऊन देशसेवा करण्याची ओढ असलेल्या तीन तरुणांची गोष्ट झी मराठीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत दाखवण्यात येत आहे. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने याही मालिकेत हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या मालिकेत हणमंत फौजी यांनी कारगिल युद्धामध्ये लढताना हात गमावल्याने इंफन्ट्रीकडून कारगिल विजय दिवशी त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. हणमंत त्यांच्यासोबत अजिंक्यलाही घेऊन जातात. ट्रेनिंग सेंटरचं वातावरण पाहून अजिंक्य भारावून जातो. ‘लागिरं झालं जी’चा हा विशेष भाग येत्या 26 आणि 27
जुलैला पाहता येईल.

Post a Comment

 
Top