Add

Add

0
 पुणे (प्रतिनिधी):-:- माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्यावतीने "उर्दू लोकराज्य" हे मासिक दरमहा प्रसिध्द करण्यात येते. अल्पसंख्याक समाजातील विशेषत: उर्दु भाषिक नागरिकांना व त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांना या मासिकाच्या माध्यमातून  शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची व विविध उपक्रमांची माहिती व्हावी व त्यांना या योजनाचा फायदा व्हावा याबाबत माहिती देण्यात येते. उर्दु भाषिक नागरिकांपर्यंत हे मासिक पोहचण्यासाठी शासनसतरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत येथील लष्कर (कँप) भागातील पूना कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स येथे मंगळवार, दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता उर्दू वाचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

 
Top