Add

Add

0
                             गुरव समाजाला पहिल्यांदाच  प्रतिनिधीत्व ... 

पौड (प्रतिनिधी):-पौड सोसायटीच्या चेअरमनपदी धनवट व्हा.चेअरमनपदी भुमकर बिनवि
रोध  (गुरव समाजाला पहिल्यांदीच प्रतिनिधीत्व)  मुळशी तालुक्याची राजधानी असलेल्या  पौडगावच्या पौड  विविध कार्य कारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी दिगंबरनाथ ग्रामविकास पॕनचे  जालिधंर धनवट तर व्हा. चेअरमनपदी सौ.नंदाताई भुमकर यांची बिनविरोध  निवड झाली . आपआपसात ठरल्यानुसार कांता भोयणे व लक्ष्मीबाई भोयणे यांनी अनुक्रमे चेअरमन व व्हा.चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी आज निवडणुक घेण्यात आली होती .पौड हे बाराबलुत्याचे गाव म्हणुन प्रचिलीत आहे. संस्थेच्या स्थापने पासुन गुरव समाजाला संस्थेत स्थान देण्यात आले नव्हते .यावेळेसच पहिल्यांदीच गुरव समाजाचा प्रतिनिधी चेअरमनपदी असणार आहे . दिगंबरनाथ ग्रामविकास पॕनचे प्रमुख माजी सरपंच व मुळशीरत्न चे संपादक विनायक गुजर यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापूर्वी निवडणुकीत १३ पैकी सात जागेवर दिगंबरनाथ ग्रामविकास पॕनचे संचालक  निवडुन आले होते . यावेळी विनायक गुजर यांनी जालिधंर धनवट व सौ.नंदाताई भुमकर यांचे वृक्ष ( रोपटे   )देऊन स्वागत केले .यावेळेस माजी चेअरमन एकनाथ जाधव ,माजी  व्हा.चेअरमन लक्ष्मण वाल्हेकर , कांता भोयणे , लक्ष्मीबाई भोयणे , महेंद्र भुमकर , निवडणुक अधिकारी एम.एम.नरुटे , संस्थेचे सचिव जयंतीलाल शेठ , साह्यक सागर कंधारे  , उपस्तित होते . चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल  आपले मत मांडताना जालिधंर धनवट म्हणालेकी माजी सरपंच   विनायक गुजर यांच्यामुळेच ६६ वर्षात पहिल्यांदीच गुरव समाजाला सोसायटीत स्थान मिळाले व चेअरमनपदाचा मान ही विनायक गुजर व पॕनलच्या सर्व संचालकांनमुळेच  त्यांच्यामुळे मिळाला .गुजर यांनी दाखवलेला माझ्यावरचा विश्वास सार्थ करुन दाखवेल .अशी भावना व्यक्त धनवट व भुमकर यांनी व्यक्त केली .विनायक गुजर व  उपस्तित मान्यवरांच्या हस्ते  संस्थेच्या आवारात वृक्षलागवड करण्यात आली .

Post a Comment

 
Top