Add

Add

0
 24 जुलैपर्यत आक्षेप सादर करण्याचे आवाहन

            पुणे:- अपर सचिव, नियोजन विभाग,मंत्रालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीची निवडणुक घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (निवडणुक) नियम 1999 मधील नियम 5 मधील तरतुदीनुसार, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका निर्वाचित सदस्यांच्या आधारे, जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. सदरहू मतदार यादी 19 जुलै,2017 रोजी जिल्हा नियोजन समिती कार्यालय जिल्हा परिषद,जुनी इमारत, पुणे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांचे कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. यासोबतच नगरपरिषद- बारामती, लोणावळा, तळेगाव दाभाडे, दौंड, चाकण, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरूर, जुन्नर, राजगुरुनगर आणि भोर यांच्या कार्यालयात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. pune.nic.in या संकेतस्थळावरसुध्दा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  प्रारुपरित्या प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत, नाव समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी असल्यास किंवा यादीत नाव समाविष्ट करण्याबद्दल अथवा कोणत्याही  नोंदीतील तपशिलाबद्दल कोणताही आक्षेप घ्यावयाचा असल्यास अशी मागणी किंवा आक्षेप दिनांक 24 जुलै,2017 रोजी सायंकाळी 5-00 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करता येईल. प्राप्त होणारे आक्षेप विचारात घेऊन अंतिमरित्या मतदार यादी दिनांक 25 जुलै,2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

 
Top