Add

Add

0

पुणे(प्रतिनिधी):- राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे रविवार दि.23जुलै रोजी उद्यान प्रसाद कार्यालय,पुणे येथे  इ.१० वी चे १६४ विद्यार्थी,१२ वी चे ४७ विदयार्थी आणि MPSC/UPSC ५ विदयार्थी असे एकुण २१६ गुणवंत ओबीसी  विद्यार्त्यांचा सत्कार समारंभ  मा.डॉ.एस.एन.नवलगुदकर,माजी उपकुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वं प्रमुख पाहुणे डॉ.सिद्धार्थ धेंडे,उपमहापौर,पुणे मनपा यांचे शुभहस्ते संम्पन्न झाला याप्रसंगी मा.कृष्णकांत कुदळे व कुमार आहेर यांना महाराष्ट्र शासनाचा उत्थान पुरस्कार मिळाला म्हणून विशेस सन्मान करण्यात आला तर मान्यवरांना,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ,महात्मा फुले उपरणे पुस्तक संच आणि ले.रघुनाथ ढोक यांचे  महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देण्यात आले.तसेच विद्यार्त्यानाही सन्मानचिन्न प्रमाणपत्र ,ग्रंथ भेट दिले.
यावेळी पुण्यनगरीचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे आपले भाषणात म्हणाले कि महात्मा फुले यांनी त्यावेळी प्रस्तापिंतांचे विरुद्ध जाऊन मागास ,अस्पृश्य आणि महिलांसाठी प्रथम शिक्षण सुरु करून शेवट पर्यंत प्रयत्न केला म्हणूनच दर.डॉ.आंबेडकर यांनी त्यांना गुरु मानले आणि बाबासाहेब यांनी देखील त्याच प्रमाणे विविध घटकांचा विचार करूनच भारतीय राज्यघटना लिहिली. तरी देखील आज पण तळागाळातील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळत नाही , पुरेशे शिकविणारे शिक्षक नसतात हे मी उपमहापौर म्हणून मनपा ,महात्मा फुले शाळेत नुकतेच भेट दिली असता पहिले आहे.ते पुढे असे पण म्हणाले कि खर्या अर्थाने समाजपरिवर्तन घडविण्यासाठी विविध संघटनेने एकत्र येऊन जातीव्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करावा.
सत्कार प्रसंगी एका मुलीने आम्ही गुणवंत असताना जातीचा अडसर निर्माण होऊ नये असे उद्गार काढले.तर mpsc चे विद्यार्थी प्रमोद कुदळे (DYSP),ज्ञानेश्वर दुरगुडे(कृषी मंडळ अधिकारी) यांनी आतापासूनच सपर्धा परीक्षा विचार मनात ठेऊन पुढील वाटचाल करा म्हंटले . मा.कृष्णकांत कुदळे व कुमार आहेर यांनी सन्मानित केले म्हणून आभार मानले तसेच समाजाने आपल्या उत्पन्नात्तील काही भाग समाजकार्यासाठी दिला पाहिजे असे म्हंटले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.नवलगुंदकर म्हणाले कि अभ्यासाबरोबर विद्यार्त्यानी महापुराषांचे तसेच इतर चांगली पुस्तके वाचून मोठी ध्येय उराशी बाळगावी म्हणजे यश आपल्या मागे येईंल ,आई वडिलांची सेवा करा ,गुरुजानाचा मान राखा आणि महत्त्वकांशी बना असा मौलीक सल्ला दिला.

 डॉ.प्रल्हाद वडगांवकर यांनी प्रसाविक भाषणात म्हणाले कि १९८० पासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी साठी काम करीत आहे ,लवकरच दिल्ली येते ओबीसी अधिवेसन घेणार आहोत, तसेच सरकारने बोगस जातीचे दाखले मिळविण्यारांवर योग्य कारवाई करावी असे म्हंटले.या कार्यक्रमास  विश्व नागरी पतसंस्था,श्री सुधाम धाडगे, सुशील घोडके ,ठाणे चे मा.रमेश जाधव ,संदीप कुदळे यांनी मोलाचे सहकार्य केले सुत्रसचालन प्रो.गायत्री लडकत तर सुरवातीला सूड कादंबरी आधारित  जानकी या नाटकातील तरुणांनी श्रीमुक्तीवादी नाटक सदर केले तर फुले शाहू आंबेडकर यांचे जीवनावर प्रो.राखी रासकर यांनी गीत गायिले आणि आभार प्रदर्शन सरचिटणीस श्री.रघुनाथ ढोक यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज आणि विविध समाजाचे प्रतिनिधी  हजर होते.

Post a Comment

 
Top