Add

Add

0

पुणे - जिल्‍ह्यातील सर्व रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णांकडून घेण्‍यात येणा-या फीचे फलक लावण्‍यात यावेत, रुग्‍णालयात दरमहा होणा-या सिझेरियन तसेच नॉर्मल डिलीव्‍हरीची आकडेवारीही दर्शनी भागात लावण्‍यात यावी अशा ग्राहकोपयोगी सूचना जिल्‍हास्‍तरीय ग्राहक संरक्षण परिषदेमध्‍ये करण्‍यात आल्‍या. जिल्‍हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात झाली. यावेळी पोलीस उप अधीक्षक (गृह) बरकत मुजावर, सहायक पोलीस आयुक्‍त वैशाली माने, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सहायक पुरवठा अधिकारी अनिल कारंडे या अधिका-यांसह अरुण वाघमारे, तुषार झेंडे, रमेश फोंडगे, विश्‍वनाथ लोंढे पाटील, विद्या म्‍हात्रे, मिलिंद बोले, बाळासाहेब औटी, लहू सुतार, सर्जेराव जाधव, दिलीप शिंदे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मांडण्‍यात आलेल्‍या विषयांवर तसेच  तक्रारींची चौकशी करुन  संबंधित विभागांकडून अहवाल मागवण्‍यात येईल, असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी भालेदार यांनी सांगितले. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍य महावितरण कंपनी, अन्‍न व औषध, महसूल, पुरवठा आदी विभागांबाबतच्‍या विषयावर चर्चा झाली. दहा रुपयांची नाणी चलनातून बाद झालेली नसून ती स्‍वीकारण्‍यात यावी, असे सर्व बँकांना पत्र देण्‍यात यावे, शालेय परिसर, गर्दीच्‍या ठिकाणी निर्भया पथक पाठविण्‍यात यावे,  सिग्‍नलवर भीक मागणा-यांवर कारवाई, गुटखा विक्रीवर कारवाई आदी  सूचनाही बैठकीत मांडण्‍यात आल्‍या.

Post a Comment

 
Top