Add

Add

0
पुणे(प्रतिनिधी):-'कुटुंबवत्सल आणि प्रत्येकाचा पाहुणचार करीत माणसांच्या घोळक्यात आयुष्य रमव लेला  माणूस ,शिक्षक ,यश्वस्वी शीघ्रकवी ,विक्रमवीर गीतकार ,कलाक्षेत्रातील निर्व्यसनी कलाकार ,शासकीय योजनात जनजागृती करणारा आणि असंख्य मदतपर कार्यक्रमांना उपलब्ध राहणारा सजग साथी ,पत्नीला  आजारात साथ देण्यासाठी  3 वर्षे कोल्हापूर न सोडणारा पती ,मुलीला आयुष्यात उभे करण्यासाठी  तिच्या समवेत 72व्या वर्षी पत्रकारिता शिकणारा पिता,प्रत्येकाच्या वाढदिवसाला शुभेच्छागीत लिहिणारा नाते वाईक अशी प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांची अनेक रूपे पुणेकरांनी अनुभवली !
निमित्त होते 'रसिक मित्र मंडळ ' आयोजित सुवर्णमहोत्सवी 'एक  कवी -एक भाषा ' व्याख्यानमालेचे . रसिक मित्र मंडळ’च्या ‘एक कवी -एक भाषा’ या मासिक व्याख्यानमालेच्या 50
 व्या  सुवर्णमहोत्सवी व्याख्यानात  कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांच्यावरील  पुष्प गुंफले गेले आणि पुणेकर रसिक स्मृतिरंजनात डुंबून गेले . जगदीश खेबुडकर यांची कन्या सौ.अंगाई महाजनी-खेबुडकर यानी  खेबुडकरांच्या काव्यांचा जीवनपट सादर केला  
​ ​
हा कार्यक्रम मंगळवार
​,​
 दिनांक 
​25​
 जुलै रोजी 
​सायंकाळी 6​
 वाजता पुणे श्रमिक पत्र कार भवन, गांजवे चौक, सदाशिव पेठ येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक मधू पोतदार होते . खेबुडकर कुटुंबीय यावेळी खासकरून उपस्थित होते . 
लावण्या ,गीते ,भक्तिगीते ,देशभक्तीपर गीते ,अभंग ,स्फुर्तीगीते ,,नांदी ,पोवाडा ,गवळण ,पासून नंदीबैल गीते पर्यंत त्यांनी काव्याचे 70 हून अधिक प्रकार हाताळले असल्याची माहिती अंगाई खेबुडकर यांनी दिली . मुलांची नावे कविता ,अभंग ,अंगाई ,मुक्तछंद ,अशी ठेवणारे खेबुडकर काव्यात किती समरस झाले होते ,याचा प्रत्यय रसिकांना आला .51 वर्षांची प्रदीर्घ गीत कारकीर्द  आणि 63 वर्षांची काव्य कारकीर्द करणारे खेबुडकर हे एकमेव कवी असल्याचे अंगाई खेबुडकर यांनी सांगितले . 
रसिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी प्रास्तविकात मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला . कवी प्रदीप निफाडकर यांनी सूत्रसंचालन केले .व्याख्यानादरम्यान जगदीश खेबुडकर यांच्या जीवनप्रवासाची माहि ती देणारा ‘माहितीपट’ दाखविण्यात आला तसेच त्यांनी रचलेल्या गीतांची झलक देखील यावेळी रसिकांना अनुभवायला मिळाली 
सौ .अंगाई खेबुडकर -महाजनी यांनी त्यांचे पिता जगदीश खेबुडकर यांच्या जीवनाचा पट उलगडला आणि खेबुडकर यांच्या अनेक अस्पर्शित पैलूंना उजाळा दिला . 
गांधीहत्येनंतरच्या जाळपोळीत घर जळताना त्यांनी  'मानवते ,तू विधवा झालीस ' ही  पहिली कविता लिहिली . घरच्यांची शाबासकी मिळाल्यावर त्यांच्या काव्य आणि गीतलेखन प्रवास सुरु झाला. अनेक कविता नियतकालिकातून साभार परत आल्यावरही जिद्द न हारता त्यांनी कारकीर्द यशस्वी केली. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना आकाशवाणीचा मार्ग दाखविला आणि मग खेबुडकर यांनी मागे वळून पाहिले नाही !!
जगन्नाथ कुलकर्णी उर्फ जगदीश खेबुडकर यांच्या जीवनाची अनोखी दास्तान गुंफताना सौ .अंगाई खेबुडकर -महाजनी यांनी रसिकांना गुंगवून टाकले . त्यांच्या कारकिर्दीचे श्रेय ग्रामीण सांस्कृतिक संस्काराला ,घरच्या वातावरणाला आणि पत्नीला होते ,हेही त्यांनी नमूद केले . 
‘रसिक मित्र मंडळ’ जुन्या कलावंतांना न विसरता नव्या कलावंतांना व्यासपीठ देत गेली 35
 वर्षे सुरू आहे. साधारणतः एक ते दीड तासाचे व्याख्यान, आणि चहापान असा हा दोन ते अडीच तासाचा सोहळा पण भरपूर काही देणारा ठरला
​ आहे,याची प्रचिती रसिकांना आली 

Post a Comment

 
Top