Add

Add

0
साहित्‍यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची अनुदान व बीजभांडवल योजना

 सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात त्यापैकीच साहित्‍यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती पुढील प्रमाणे.
मातंग व तत्सम 12 पोट जातीतील  म्हणजेच मांगमातंगमिनी मादगी, मादीग,दान खणी मांगमांग महाशीमदारी,  राधे मांग,मांग गारुडीमांग गारोडीमादगी व मादीगा या पोट जातीतील बांधवाना अर्ज करता येतील.

योजनेचे स्वरुप...        
 महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या अनुदान बीज भांडवल योजनेंतर्गत 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एकूण4.72कोटींच्या उदिष्टाची तरतूद आहे.यातअनुदान योजनेतर्गत2कोटीची तरतूद आहे.  त्यात 2000 प्रकरणे केली  जातीलबीजभांडवल  योजनेंतर्गत 330लाभार्थ्यांकरीता 2.39 कोटींचे उदिष्ट आहेयात नवीन 330 प्रकरणे केली जातीलदोन्ही योजनांची बॅंक  निहाय उदि्ष्ट जिल्हयाच्या अग्रणी बँक अधिकारी  यांच्या मार्फत पुणे जिल्हयातील राष्ट्रीयकृत कार्यरत बँकांना वितरीत करण्यात आली आहेत.
 अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारपर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महा मंडळाकडून अनुदान मिळतेप्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात येतेअनुदान  वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते.या कर्जावर बँकेच्‍या दराप्रमाणे व्याज आकारणी केली जातेकर्ज फेड 36 ते 60 मासिक  हप्त्यात बँकेकडे करावी लागते.
   बीजभांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50,001 रुपये ते लाखापर्यंत आहे. 50,001 ते लाखापर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणात 10हजार रुपये अनुदान वगळता उर्वरीत कर्जात टक्के अर्जदारांचा सहभाग, 20 टक्के  महामंडळाचे कर्ज (10 हजार रुपये अनुदानासह व 75टक्के बँकेची कर्ज रक्कम आहेमहामंडळाच्या कर्जाची परतफेड टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे.

अर्ज करण्याची पध्दत.... 
  या योजनेच्या लाभासाठी एका लाभार्थ्यास एकच कर्ज मागणी अर्ज दिला जाईलपुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील गरजूंनी विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून घेवून जिल्हा कार्यालयातच जमा  करणे  आवश्यक आहे.

संपर्क कार्यालयाचे नाव:-

            जिल्हा व्यस्थापक, 424, मंगळवार पेठलडकत पेट्रोल पंप जवळपुणे.
           (दुरध्वनी क्र. -020-26128634)
                                                                                                                        -विशाल कार्लेकर
                                                                                                                     सर्वसाधारण सहायक
                                                                                                                 जिल्हा माहिती कार्यालय,पुणे

Post a Comment

 
Top