Add

Add

0

पुणे- कार्टूनिस्ट्स  कंबाइन च्‍या नूतन कार्यकारिणीची बैठक चारुहास पंडित यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नुकतीच  संपन्न झाली. यावेळी नूतन अध्‍यक्ष विवेक मेहेत्रे, रवींद्र बाळापुरे, महेंद्र भावसार,  विश्‍वास सूर्यवंशी, राधा गावडे, अमोल  ठाकूर, भटू बागले, दिनेश धनगव्‍हाळ, प्रभू केळुस्‍कर, अरविंद  गाडेकर, राजेंद्र सरग आदी व्‍यंगचित्रकार उपस्थित होते. प्रारंभी मावळतेअध्‍यक्ष चारुहास पंडित यांनी अध्‍यक्षपदाचा कार्यभार श्री. मेहेत्रे यांच्‍याकडे  सोपविला.  काही अपरिहार्य कारणामुळे ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांनी उपाध्‍यक्षपदाची जबाबदारी स्‍वीकारणे शक्‍य नसल्याचे कळवल्‍याने रवींद्र बाळापुरे यांची उपाध्‍यक्ष म्‍हणून निवड करण्‍यात आली.
            व्‍यंगचित्रकलेचे रसिक वाढविण्‍यासाठी व्‍यापक प्रयत्‍न करण्‍याचे बैठकीत ठरवण्‍यात आले. कार्टूनिंग हा विषय अभ्‍यासक्रमात समाविष्‍ट व्‍हावा, व्‍यंगचित्रकारांना पत्रकारांप्रमाणे महाराष्‍ट्र शासनाची अधिस्‍वीकृती पत्रिका मिळावी,  प्रतीवर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारी मध्‍ये अखिल भारतीय स्‍तरावर व्‍यंगचित्रकारांचे संमेलन घेण्‍यात यावे, विभागनिहाय वेगवेगळे उपक्रम राबवून व्‍यंगचित्रकलेचा प्रचार आणि प्रसार करावा याबाबत बैठकीत चर्चा झाली.
कंबाईनची सभासद नोंदणी मोहीम सुरु करण्‍यात आली असून सभासद शुल्‍क वार्षिक  300 रुपये निश्चित करण्‍यात आले आहे. सभासद होण्‍यासाठी नियम पुढीलप्रमाणे असून अर्जदार मराठी भाषिक असावा, अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्‍त असावे, अर्जदाराची किमान दहा व्‍यंगचित्रे मान्‍यताप्राप्‍त वर्तमानपत्रे, नियतकालिक‍, पुस्‍तक किंवा इलेक्‍ट्रॉनिक माध्‍यमातून प्रसिध्‍द झालेली असावी.  विहीत नमुन्‍यातील अर्ज पासपोर्ट आकारातील स्‍वत:च्‍या रंगीत  छायाचित्रांसह  भरुन कार्यकारिणीच्‍या सदस्‍यांकडे देता येईल.

Post a Comment

 
Top