Add

Add

0
10ऑगस्ट 2017 रोजीशिवाजी नाट्यमंदिरात रंगणार प्रकाशन सोहळा!

मुंबई (प्रतिनिधी):-'संवेदना प्रकाशन' पुणे, यांनी 'आपला सिनेमा' हे नवे पुस्तक तयार केले असून रत्नाकर पिळणकर त्याचे लेखक आहेत. नाट्य- सिनेमा या विष यावर नियमित विपुल लेखन करणाऱ्या रत्नाकर लि.पिळणकर यांचे हे सिनेमा वरील 5 वे पुस्तक. या आधी त्यांची विविध विषयावरील 14 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
'आपला सिनेमा' या पुस्तकात हिंदी सिनेमातील विविध विभागांचा अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडला असून, संगीत व संगीतकार, गीते व गीतकार, गायकांच्या जीवनाविषयी, तसेच चित्रपटातील कलाकारांच्या जीवनात घडलेल्या आगळ्या वेगळ्या प्रसंगावर आधारित लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या या लेखनातून हिंदी सिनेसृष्टीच्या माहितीपूर्ण गोष्टींमुळे वाचकांचे मनोरंजन व्हावे असा उद्देश आहे.
प्रकाशन समारंभाचे निमित्त साधून रत्नाकर पिळणकर यांचीच संकल्पना असलेला 'फिल्म इंडस्ट्री' हा नवा मनोरंजक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. असा हा प्रकाशन व शुभारंभाचा एकत्रित कार्यक्रम गुरुवार दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्रौ. ८:०० वाजता शिवाजी नाट्यमंदिरात संपन्न होणार आहे.

Post a Comment

 
Top