Add

Add

0
पौड (प्रतिनिधी):- अजितदादांचा सतत कार्यमग्नतेचा गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारावा असे आवाहन मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे यांनी कोळावडे येथे केले.माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वाढदिवसानिमीत्त माजी सभापती महादेव कोंढरे यांचे वतीने शालेय साहित्य वाटप वाटप समारंभात चांदेरे बोलत होते.अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा  प्रा. सविताताई दगडे होत्या.
            सत्त्तेप्रमाणेच विरोधातही तेवेवढेच सार्वजनिक कामात व्यस्त असणारे दादा विद्यार्थी  व कार्यकर्त्यांपुढे एक आदर्श आहेत.उपलब्द प्रतेक क्षणाचा उपयोग  आपल्या शालेय जीनणात अभ्यासासाठी करून घेणे हीच अजितदादांना वाढदिवसाची खरी शुभेच्छा ठरेल,
असे चांदेरें यांनी याप्रसंगी सांगीतले.
यावेळी माजी सभापती महादेव कोंढरे,जिल्हा परिषद सदस्य अंजली कांबळे, पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे, सरपंच सयाजी आढाव, माजी सरपंच अंकुश उभे,दत्ता उभे,माऊली कांबळे, अंकुश येनपुरे मुख्याध्यापक यादव व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.यावेळी महादेव कोंढरे यांचे वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

      मुळशी तालुक्याच्या विकासात अजितदादांचे भरीव योगदान आहे.मुळशीतील मुलींना उच्य शिक्षणाची संघी दादांनी उपलब्ध करून दिल्याने अनेक मुली आर्थीक दृष्ट्या स्वावलंबी झालेल्या असल्याचे प्रा. सविताताई दगडे यांनी यावेळी सांगीतले.प्रास्तविक सरपंच सयाजी आढाव यांनी केलं तर आभार माजी सरपंच दत्ता उभे यांनी मानले.

Post a Comment

 
Top