Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागामार्फत मंचर येथे आदिवासी (एस.टी.) उमेदवारांकरिता 1 ऑगस्ट 2017 पासून स्पर्धा परीक्षापूर्व सत्र सुरु होत आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता माहिती व मार्गदर्शन केंद्र, बद्रुनिस्सा मंजिल, घोडेगाव रोड मंचर या केंद्रामार्फत आदिवासी उमेदवारांना साडे तीन महिने कालावधीचे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण हे पूर्ण वेळ असून उमेदवारांना स्वयंरोजगाराबद्दल माहिती  दिली जाणार आहे. तसेच प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना रुपये 1 हजार इतके विद्यावेतन दिले जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण व वय 18 ते 35 इतके असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसोबत बुधवार दि. 26 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वाजता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता माहिती व मार्गदर्शन केंद्र, बद्रुनिस्सा मंजिल, घोडेगाव रोड मंचर ता.आंबेगाव जि.पुणे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी 02133223081 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती संभाजी डगळे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी, मंचर यांनी दिली आहे.

Post a Comment

 
Top