Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):-’पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी क्रीडा विभागातर्फे ’युवा क्रीडा प्रशिक्षक गौरव समारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. रविवारी हा कार्यक्रम मुक्तांगण शाळा हॉल येथे झाला. गौरव समारंभातंर्गत विविध खेळात स्वतः पदक मिळवलेले व नवीन खेळाडू घडविण्यात मोलाचे योगदान देत आहेत अशा खेळातील 3 महिला व 4 पुरुष प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. 
’राष्ट्रवादी कॉगे्रस पार्टी’चे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे - पाटील, पुणे शहर सरचिटणीस नितीन कदम, छत्रपती पुरस्कार विजेते राजेंद्र राऊत यांच्या हस्ते गौरवचिन्ह देण्यात आले.यावेळी क्रीडा विभागाच्या 8 नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. कार्यक्रमाला क्रीडा विभागाचे 500 कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आलेल्या खेळाडू आणि युवा प्रशिक्षकांमध्ये पल्लवी वाघचौरे (कब्बडी), शिवानी गरुड (हॅण्डबॉल), मंगल कांबळे (मॅरेथॉन), नितीन शेटे (कराटे), ओंकार राठोड (किक बॉक्सिंग), संभाजी वाघ (फुटबॉल), तुषार गोळे (कुस्ती) यांचा समावेश होता.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस क्रिडा विभाग शहराध्यक्ष विपुल म्हैसूरकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘पुणे शहरामध्ये अनेक प्रतिष्ठित क्रीडा प्रशिक्षक आहेत, ज्यांचे अनेक सत्कार झाले आहेत. पण हेच सत्कार त्यांच्या उमेदीच्या काळात म्हणजे ते घडत असतानाच्या काळात जर झाले असते, तर त्यांचा आत्मविश्‍वास अजून, वाढला असता म्हणूनच आज आम्ही असे युवा क्रीडा प्रशिक्षक निवडले की जे स्वतः आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू आहेत, व असेच खेळाडू घडवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देत आहेत. तसेच क्रीडा विभागाच्या कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जाऊन लोकांची कामे करून, पक्षाला बळकटी दिली पाहिजे.’
रवींद्र माळवदकर म्हणाले, अशा प्रकारच्या मेळाव्याबद्दल कौतुक आहे व अशाच प्रकारची कामे आगामी काळात चालू ठेवणे आवश्यक आहे. आमचा कायम पाठिंबा राहील.’
चेतन तुपे पाटील म्हणाले, ‘आगामी काळात क्रीडा विभागातर्फे वेगवेगळ्या खेळात महापौर स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे.’
यावेळी ’पुणे महानगरपालिके’तर्फे महिला खेळाडू व महिला क्रीडा प्रशिक्षकांसाठी विशेष शिष्यवृत्ती चालू करावी, अशी मागणी ’क्रीडा सेल’च्या वतीने चेतन तुपे यांच्याकडे करण्यात आली. चेतन तुपे यांनी मागणीस त्वरित होकार दिला. कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये राष्ट्रवादीचे पुणे शहर सरचिटणीस नितीन कदम, ’क्रीडा सेल’ शहर अध्यक्ष विपुल म्हैसूरकर, समीर पवार, प्रशांत कदम, ओम कासार, युवराज दिसले, अमोल नागटिळक, कुमार भोसले, ओंकार पालकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Post a Comment

 
Top