Add

Add

0
       

पुणे (प्रतिनिधी):-‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस’, पुणे च्या वतीने समुपदेशन ( कौन्सिलिंग) व सी एस आर- कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ( सीएस आर) या अभ्यासक्रमांसाठी 29 जुलै रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर व अभ्यासक्रम प्रमुख प्रा. महेश ठाकूर यांनी दिली. 
समुपदेशन व सी एस आर या दोन्ही अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज कर्वे समाज सेवा संस्थेच्या website www. karve-institute.org या वेबसाईट वरुन अर्ज डाउनलोड करून  भरून तो kinsspune.pgdcmh वर ईमेल करून ऑनलाईन नोंदणी फी भरून अर्ज करावा. तसेच महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असून, अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 27 जुलै 2017 आहे .29 जुलै रोजी प्रवेश परीक्षा व मुलाखती घेण्यात येण्यात येणार आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच एम. एस. डब्ल्यू किंवा एम बी ए पदवीधारक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करू शकतात. 
विविध रुग्णालये, पुनर्वसन केंद्रे, मानसोपचार, मानसिक आरोग्य विभाग आणि समुपदेशन केंद्रांमध्ये समुपदेशन किंवा मानसिक आरोग्याशी निगडित प्रकल्पांवर काम करण्यास इच्छुक असणार्‍यांना समुपदेशन अभ्यासक्रम तसेच कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी (सी एस आर) विभागांमध्ये व सामाजिक बांधिलकी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध प्रकल्पांमध्ये करिअर करण्याची इच्छा असणार्‍या विध्यार्थ्यांना या सी एस आर अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
समुपदेशन ( कौन्सिलिंग) व कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी - सी एस आर  हे दोन्ही अभ्यासक्रम एक वर्ष अर्धवेळ कालावधीचे असून, शनिवार आणि रविवार चालविण्यात येणारे असल्याने काम करून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी व व्यावसायिकांना याचा मोठा लाभ होणार आहे, असे संस्थेचे संचालक डॉ. दीपक वालोकर यांनी अभ्यासक्रमाची माहिती देताना सांगितले.
प्रवेशअर्ज व संपर्कासाठी पत्ता;कर्वे समाज सेवा संस्था,18,हीलसाईड,कर्वेनगर,पुणे-411052,वेब साइट: karve-institute.org.com , दूरध्वनी: 020-65007565/65007566, Mob No. - 9730128350 / 9850328350
कर्वे समाज सेवा स्वयंसेवी संस्था ही प्रथम दहा समाजकार्य महाविद्यालयांपैकी एक असून नॅक मानाकिंत ‘अ’ दर्जा प्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामार्फत चालविण्यात येते. 

Post a Comment

 
Top