Add

Add

0

                          

 मुंबई :- सध्या सोशल मीडियावर सोनूच्या गाण्याचा फिव्हर चढलेला आहे.आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूच्या गाण्याची वेगवेगळी रुपेदेखील पाहिली असतीलच आता यात भर पडणार आहे ती मालवणी व्हर्जनची, पण यात भरवश्याचा प्रश्‍न सोनूला नाही तर गाववाल्यांना विचारला आहे आणि हे गाववाले ‘गाव गाता गजाली’ या झी मराठीवरील आगामी मालिकेतील आहेत. या मालिकेतून मालवणीतील गजालीची धम्माल बघायला मिळणार आहे. याच मालिकेच्या प्रमोशनचा भाग म्हणून हा खास व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. येत्या 2ऑगस्टपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वा. ‘गाव गाता गजाली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढलेली असताना या गाण्याचा मनमुराद आनंद देखील लुटत आहेत.

Post a Comment

 
Top