Add

Add

0
केंद्र सरकारचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय व हुतात्मा राजगुरु महावि द्या लय तसेच राज्य शासनाच्या वतीने  पुणे जिल्ह्यातील राजगरु नगर  येथे दिनांक 29 ते 31 गस्ट 2017 दरम्यान तीन दिव सीय नवभारत का मंथन-संकल्प से सिद्धी या विषयावर विशेष प्रचार अभियान.


केंद्र पुणे(प्रतिनिधी):- सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय हुतात्मा राजगुरु महाविद्याय व राज्य शारनाच्या  वतीने  पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर  येथे दिनांक 29ते31गस्ट, 2017 दरम्यान तीन दिवशीय नवभारत का  मंथन-संकल्प से सिद्धी या विषयावर विशेष प्रचार अभियानाचे  आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाद्वारे  विद्यार्थी-युवकांमध्ये  देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोरांचे योगदान, या लढ्यातील हूतात्मा शहिदांच्या आठवणींना उजाळा, भारतील स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा , राष्ट्रीय एकात्मता अधिक द्दढ करण्यासाठी 1857 ते 1947 या भारतीय स्वातंत्र्य लढ्याची यशोगाथा तसेच नवभारताच्या निर्मितीत सर्वांच्या योगदानातून सन 2022 पर्यंत स्वच्छ भारत, गरीबी मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत, दहशतवाद मुक्त भारत, सम्प्रदायमुक्त भारत, जातिवाद मुक्त भारत करण्यासाठी संकल्प करुन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.
पहिल्या व दूसऱ्या दिवशी (दिनांक 29 व 30 गस्ट)मॅराथान स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा, चित्रकला आदी स्पर्धांचे आयोजन तसेच लघु चित्रपट व भारत सरकारच्या गीत व नाटक विभागाच्या वतीने मनोरंजनाच्या माध्यमातून युवकांना  माहिती देण्यात येणार आहे.

     तीस-या दिवशी(मुख्य कार्यक्रम) दिनांक 31 गस्ट 2017 सकाळी 10.00 वाजता या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी  मान्यवरांच्या व्याख्यानांतून भारतीय स्वातंत्र्याचा लढयाची येशोगाथा तसेच नवभारत का  मंथन-संकल्प से सिद्धी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल.  त्यानंतर या कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या मॅराथान स्पर्धा, रांगोळी, निबंध आणि चित्रकाल स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार सुरेश गोरे, खेड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष प्रतापराव टाकळकर, राजगुरुनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष बापुसाहेब थिगळे, हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ॰ एस. बी.पाटील, रजिष्ट्रार, कैलाश पाचरणे,  कांदा व लसुन संशोधन संचालनालयाचे संचालक, डॉ॰  मेजर सिंग, उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे. विभागीय पोलीस अधिकारी पठारे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, तहसिलदार सुनिल जोशी, गट विकास अधिकारी इंदिरा अस्वार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

        अशी माहिती भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये व क्षेत्रीय प्रचार सहायक फणिकुमार  यांनी दिली.

Post a Comment

 
Top