Add

Add

0
*पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील 110 तक्रारीवर जनसुनावणीत झाली कार्यवाही*
*पुणे,सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर मधील फेब्रुवारी 2016 पासूनच्या सर्व तक्रारीवर कार्यवाही पूर्ण*

पुणे(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत पुणे येथे जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाकडे दाखल असलेल्या 24 तसेच सुनावणी दरम्यान प्राप्त 26 नव्या तक्रारी अशा एकूण 50 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह वकील, पोलीस अधिकारी, समुपदेशक व महिला व बाल विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली.

दिनांक 19ऑगस्ट 2017 रोजी कोल्हापूर येथे अशाच प्रकारे 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत सुनावणी घेऊन 60 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. कोल्हापूर येथील सुनावणीत विभक्त होण्याच्या मार्गावर असलेली 4 जोडपी समुपदेशनानंतर पुन्हा एकमताने संसारात रमली.

पुणे विभागात कोल्हापूर आणि पुणे अशा दोन ठिकाणी स्वतंत्र सुनावणी, समुपदेशन करून महिला आयोगाने अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या सर्व तक्रारीवर कार्यवाही केली आहे.  पुणे विभागातील फेब्रुवारी 2016 पासून दाखल सर्व तक्रारींवर सुनावणी पूर्ण झाली आहे,अशी माहिती श्रीमती रहाटकर यांनी यावेळी दिली.

            श्रीमती रहाटकर म्हणाल्या, 'महिला आयोग आपल्या दारी' सारख्या उपक्रमामुळे महिलांना तात्काळ न्याय मिळत आहे. त्यामुळेच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील फेब्रुवारी 2016 पासूनच्या तक्रारींबाबत 'झिरो पेंडन्सी' झाली आहे.

Post a Comment

 
Top