Add

Add

0
 मुळशी तालुका राष्ट्रीय समाज पक्ष्याच्या वतीने श्रेया कंधारेचा सत्कार .. 


पौड (प्रतिनिधी)ः-सिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्टस् चॅम्पियनशीप क्रीडा स्पर्धेत मुळशी तालु्नयातील कोंढावळे येथील कन्या श्रेया शंकर कंधारे हीने सोळा वर्षे वयोगटात दोन सुवर्णपदके पटावीत भारताचा तिरंगा जगात उंचावला आहे.आठ देशातील दोनशेपेक्षा जास्त योगापटूंना नमवित श्रेयाने ही जिगरबाज कामगिरी केली असून तिची ही कामगिरी सर्व भारतीयांना आणि मुळशीकरांना आभिमानास्पद अशीच आहे.श्रेयाने ही कामगिरी पुढील काळात अशीच उंचावत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत तीचा पाठीमागे संपूर्ण मुळशीकर उभे राहातील असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब सुतार यांनी केले 
      सिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्टस् चॅम्पियनशीप क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल मुळशी तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने श्रेया शंकर कंधारे हीचा पत्रकार भवन पौड येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी आप्पासाहेब सुतार बोलत होते.या कार्यक्रमास राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन ढेेबे,राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष शंकरढेबे,संदीप कुरवड,गणेश धनगर,बाळासाहेब आखाडे,ज्ञानेश्वर आघाडे,संजय कोकरे,टेमघरचे आदर्श सरपंच महादेव मरगळे,पौडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पिंगळे गुरूजी,आंतरराष्ट्रीय पदक विजेते कुस्तीगीर शंकर कंधारे आदि प्रमुख उपस्थित होते.
     यावेळी मुळशी तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष आप्पासाहेब सुतार यांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना पै.शंकर कंधारे म्हणाले की,‘मुळशी तालु्नयाने मला कुस्तीसाठी फार मोठे सहकार्य केले असून जनतेचे प्रेम कायम लाभ ल्यानेच मी कुस्तीक्षेत्रात भरीव कामगिरी करू शकलो.सोमाटणेफाटा येथे उभारलेले भव्य कुस्तीसंकुल व त्या मध्ये प्रशिक्षण घेत असलेली सुमारे दोनशे मुले हे उद्याचे ऑलिंपिकपट्टू घडविण्याची जबाबदारी आम्ही घेत लेली आहे.श्रेया योगामध्ये प्राविण्य दाखवित आहे,तिच्यामागेही आपले प्रेम व आशिर्वाद लाभावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.’’
   सिंगापूर येथील स्पर्धेत उत्तुंग यश प्राप्तीनंतर मुळशी तालु्नयातील जनतेच्यावतीने सत्कार करण्याची प्रथम संधी मुळशी तालुका राष्ट्रीय समाज पक्षाने मिळवून एक वेगळा आदर्श राजकीय पक्षांसमोर ठेवल्याने तालुका अध्यक्ष आप्पासाहेब सुतार व त्यांचे सर्व सहकारी यांचे कौतुक होत आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका उपाध्यक्ष मारूती गोरे,बाळासाहेब आखाडे,तालुका सचिव ज्ञानेश्वर आखाडे,सरचिटणीस संजय कोकरे,तालुका सरचिटणीस प्रकाश झोरे,रा.स.पा.तालुका युवक अध्यक्ष शिवाजी मरगळे,तालुका युवक उपाध्यक्ष भाऊ गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख प्रकाश मरगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

 
Top