Add

Add

0

    चांदणी चौक उड्डाणपुलाला अखेर मुहूर्त सापडला ... 


 पुणे(प्रतिनिधी):-चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या अनुषंगाने भूसंपादन करण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकां नीच आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने महपालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. या उड्डाणपुलासाठी आवश्यक अस णाऱ्या भूसंपादन प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून ‘एनडीए’, मुळशी रस्ता, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महा मार्ग  आणि बावधन येथील जमिनी रस्त्यासाठी संपादीत करण्यात येणार आहेत.
महापालिका प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या शहर सुधारणा समितीपुढे रस्त्यासाठीच्या जमिनी संपादीत कर ण्याचा प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे. चांदणी चौकात उड्डाणपूल बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे ‘एनडीए’, मुळशी आणि बावधनकडे जाण्या-येण्यासाठी वाहतुकीत बदल करावे लागणार आहेत. त्याशिवाय महामार्गावरून कात्रज, तसेच देहू रोडच्या दिशेकडून येणाऱ्या वाहनांना ‘एनडीए’, मुळशी आणि बावधनकडे जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र सोय करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेले रस्त्यांची आखणी बदलणार आहे. महापालिका प्रशासनाने या अनुषंगाने नवीन पाच रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील काही रस्ते चक्राकार वाहतुकीद्वारे एकमेकांना जोडले जाणार आहेत. हे रस्ते तयार करण्यासाठीचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीने मंजूर केला असून तो मुख्यसभे पुढे सादर केला जाणार आहे.
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गड करी यांच्या हस्ते 27 ऑगस्टला भूमिपूजन होणार आहे. मात्र, या उड्डाणपूलाला लागणाऱ्या जागेचे भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध सर्वसाधारण सभेत केल्यामुळे वातावरण तापले होते.
काय बदल होणार?
मुळशी रस्त्यांकडून मुंबईकडे जाण्यासाठी 12 मीटर रुंदीचे एक लूप प्रस्तावित आहे. हा रस्ता बावधन येथील सर्व्हे नंबर 55मधून अ ते ब-12 मीटर रुंदीचा आणि 30 मीटर लांबीचा रस्ता करण्याचे नियोजन आहे. तसेच, पाषाण रस्त्यावरून उड्डाणपालाचा एक फाटा (आर्म) ‘एनडीए’ रस्त्याकडे असणार आहे. तेथून हा रस्ता लूपद्वारे कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक 75 आणि 77 मधून मुंबईकडे जाण्यासाठी महामार्गाला जोडला जाईल. कात्रज बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गावरून ‘एनडीए’कडे जाण्यासाठी एक लूप सर्व्हे क्रमांक75 आणि 77मध्ये प्रस्तावित केलेला आहे. दोन्ही लूप एकमेकांना जोडण्यासाठी सर्व्हे नंबर 75मध्ये गोलाकार वाहतूक (रोटरी) प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी 12 मीटर रुंदीचे दोन लूप, रुंदीची एक रोटरी सर्व्हे नंबर 75 आणि 77 क-ड-इ-फ मध्ये प्रस्तावित आहे. यापैकी 50 मीटर लांबीचा रस्ता हा जैव विविधता उद्यान झोनमधील आहे, तर उर्वरित 60 मीटर रुंदीचा प्रस्तावित रस्ता निवासी झोनमधील आहे.
प्रस्तावित रस्ते... 
- सर्व्हे नंबर 55 बावधन (खुर्द) अ ते ब 30 मीटर लांबी आणि 12 मीटर रुंदी
- कोथरूड सर्व्हे नंबर  75आणि 77 क-ड-इ-फ 110० मीटर लांबी आणि 12 मीटर रुंदीचे दोन लूप रस्ते व रोटरी
- बावधन खुर्द सर्व्हे नंबर 20 आणि कोथरूड सर्व्हे नंबर 99- ग ते घ 230 मीटर लांबी आणि नऊ मीटर रुंदी
- बावधन खुर्द सर्व्हे नंबर 20 च ते छ 60 मीटर लांबी आणि 12 मीटर रुंदी
- बावधन खुर्द सर्व्हे नंबर 20 ज ते झ 220 मीटर लांबी आणि 12 मीटर रुं

Post a Comment

 
Top