Add

Add

0

पुणे (प्रतिनिधी):-खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक अध्यक्षपदी कुणाल विलास वेडेपाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हे निवडपत्र वेडेपाटील यांना देण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार अजित पवार यांच्या मार्गदर्शना खाली ही निवड करण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते शंकर केमसे, शहर युवक अध्यक्ष राकेश कामठे, काकासाहेब चव्हाण यासह सर्व पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पक्षाला युवकांची ताकद देणारे कुणाल वेडेपाटील खडकवासला मतदारसंघात युवकांची मोठी फळी उभी करतील. त्यांचे सामाजीक आणि राजकीय क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. पक्षाला ताकद देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली. गरीब, होतकरू आणि ज्यांना शिकण्याची आवड आहे, अशा मुलांच्या हातात पाटी, पुस्तक देऊन त्यांचा शिक्षणाची जबाबदारी घेणारे कुणाल वेडेपाटील यांनी अनेक समाजउपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. यापुढेही समाजाच्या हितासाठी काम करेल, असे मत वेडेपाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

 
Top