Add

Add

0
अहमदनगर(प्रतिनिधी):-- राज्यातील पतसंस्थांनी सर्वसामान्य नागरिकांना उभे करण्याचे काम केले आहे. राष्ट्रीयकृत, सहकारी व शेड्युल्ड बॅंकांपेक्षाही पतसंस्थांचे काम चांगले आहे. केवळ अर्ध्या टक्‍क्‍यांवर पतसंस्था आज आर्थिक कारभार करत आहेत. संचालक चांगले असले की संस्थाही चांगले काम करते. राज्यामध्ये अशा चांगले काम करणाऱ्या अनेक पतसंस्था आहेत. म्हणून या पतसंस्थांना संरक्षण देऊन प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 
राज्य पतसंस्था फेडरेशन गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पतसंस्थांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न व पाठपुरवठा करत आहेत. यासाठी पुण्यात पतसंस्थांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी बैठक घेतली.या बैठक़ीत पतसंस्थांचे सर्व प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. पतसंस्थांमार्फत प्रक्रिया उद्योग सुरु करण्यास मान्यता देणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्यावतीने पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी व महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल सहकार मंत्री देशमुख यांचा मिरजगाव येथील कार्यक्रमात सत्कार करुन आभार मानण्यात आले. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, वसंत लोढा, सुरेश वाबळे, शिवाजी कपाळे, स्वप्नील देसाई यांनी मंत्री देशमुख यांचा विशेष सत्कार केला. पालकमंत्री ना. राम शिंदे व इतर विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top