Add

Add

0

पुणे (प्रतिनिधी):-अभिनेता सुनील तावडे सध्या स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' मालिकेतल्या परसू या बहुरंगी खलनायकी छटेच्या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकां मध्ये विशेष लोकप्रिय आहेत.परसूच्या भूमिकेला वैविध्य देताना त्यांनी आजवर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.या विविध व्यक्तिरेखांचे आव्हान पेलत त्यांनी एक नवे आव्हान स्वीकारले असून, यापुढे ते नर्सच्या रूपात दिसणार आहेत. या नव्या रूपामागे काही कारस्थान आहे का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

तावडे म्हणतात, परसू वेगळा वाटण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. त्याचं हसणं वेगळं, त्याची बॉडी लँग्वेज वेगळी किंवा त्याची लकबही वेगळी वाटली पाहिजे. त्या दृष्टीनं मी हॉलिवूड अभिनेता हिथ लेजरची द डार्क नाईट या चित्रपटातील जोकरच्या भूमिकेचा अभ्यास केला. द डार्क नाइटमध्ये जोकरचा नर्सच्या वेशातील एक सीन प्रचंड लोकप्रिय ठरला होता.
तावडे यांनी सोशल मीडियामध्ये नर्सच्या गेटअपमधील फोटो नुकताच शेअर केला आहे. नर्सचे कपडे, अंबाडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला टिकली असलेला हा फोटो आहे. या फोटोला त्यांच्या चाहत्यांची मोठी दाद मिळाली असून, हजारो लाइक्स मिळाले आहेत. कारस्थानी परसूने गेटअप बदलून काही तरी चाल खेळली आहे. आता या नर्सच्या गेटअपमागे काही नवी खेळी आहे का, हे जाणून घेण्यासाठी पाहा दुहेरी मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Post a Comment

 
Top