Add

Add

0

पुणे (प्रतिनिधी):-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गा वर मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या (पीपीपी) माध्यमातून उभा रला जाणार असून यासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये तीन कंपन्या पात्र ठरल्या असून डिसेंबर अखेर पर्यंत त्यापैकी एका कंपनीला हे काम देण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर प्राधिकरणाकडून मेट्रो प्रकल्प उभारला जाणार आहे.त्यासाठी पीएमआर डीएकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यांनी पुर्वपात्रता फेरीत या तिन्ही कंपन्या पात्र ठरल्या आहेत. डिसेंबरपर्यंत त्यांना काम देण्यात येणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले की, मेट्रो प्रकल्पाच्या कामाशी संबधित कंपन्यांशी करारनामा करण्यापूर्वी तांत्रिक, आर्थिक तसेच कायदेशीरबाबींची पूर्तता करण्यासाठी ट्रान्झॅक्‍शन ऍडव्हायझर नेमण्यात येणार आहे. यासाठी आठ कंपन्या पुढे आल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसात यातील एका कंपन्यांची नेमणुक करण्यात येईल.
मेट्रोच्या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून वीस टक्के निधी उपलब्ध होणार आहे. त्यास नुकतीच मान्यता मिळाली आहे. याशिवाय यातील तूट भरून काढण्यासाठी या मेट्रो मार्गावरील 23 स्टेशनचे ब्रॅडींग करण्यात येणार आहे. त्यासाठी काही कंपन्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे. हिंजवडीतील स्टेशनचे ब्रॅडींग करण्याची तयारी इन्फोसिस या कंपनीने दर्शविली आहे. अन्य कंपन्याही पुढे येत आहेत. त्यांच्यापुढे दरमहा भाडे अथवा वन टाइम पेन्मेट असे दोन पर्याय ठेवण्यात येणार आहे.
त्याचबरोबर प्राधिकरणाचा मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्व व्हावा, यासाठी प्राधिकरणाच्या मेट्रोचा “वॉर रूम’मध्ये त्याचा समावेश करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली असल्याचे गित्ते यांनी सांगितले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील सुमारे 22 हेक्‍टर जमिनीची मागणी प्राधिकरणाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ही जागा मिळाल्यानंतर ती संबंधित कंत्राटदार कंपनीला 35 वर्षभाडेकराराने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यातून संचलनातील तूट भरून काढण्यात येणार आहे. याशिवाय म्हाळुंगे येथे पहिली टीपी स्कीम राबविण्यात येणार आहेत. त्यातून 50 एकर जागा पीएमआरडीएला मिळणार आहे. त्या जागा आयटी कंपन्यांना भाडेकरारावर उपलब्ध करून देऊन त्यातूनही निधी उभारला जाणार असल्याचे प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top