Add

Add

0
बारामती (प्रतिनिधी) :-  राज्य शासनाच्या सर्व विभागांचा मुख्य कणा हा महसूल विभाग आहे.सामान्य जनते च्या विविध कामांच्या निमित्ताने सर्वाधिक संपर्क महसूल विभागाशी येत असतो.  शासन नेहमीच विविध योज ना राबवित असते.  योजनांच्या प्रसार आणि प्रचारासाठी माहिती विभागाने संवादपर्व कार्यक्रमाच्या माध्य मातून चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असल्याचे गौरवोद्गार तहसिलदार हनुमंत पाटील यांनी काढले.
     गणेशोत्सव काळात माहिती कार्यालयाच्या  वतीने संवादपर्व कार्यक्रमाचे आयोजन सांगवी, (ता. बारामती)  येथे करण्यात आले होते.  यावेळी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, माळेगांव कारखान्याचे संचालक चंद्रराव  तावरे,  गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, सांगवीच्या सरपंच श्रीमती सीमा तावरे, उपसंरपंच भानुदास जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास तावरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल तावरे, माजी अध्यक्ष किरण तावरे, माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी विलास कसबे, शरद नलवडे, मिलींद भिंगारे, ए. एम. खान, भिमराव गायकवाड, परिसरातील नागरीक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
     तहसिलदार पाटील म्हणाले, शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना राबविल्या जात असतात.  या योजनांचा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहचणे महत्वाचे आहे. या साठी माहिती कार्यालयाने योजनांच्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना संवाद पर्वच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. 
     तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी  ठिबक सिंचन योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास योजनांविषयी माहिती दिली. गट विकास अधिकारी प्रमोद काळे यांनी पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांविषयी सविस्तर माहिती दिली.  उपस्थित बांधवांच्या शंकेचे निरसनही काळे यांनी यावेळी केले.
     संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल तावरे म्हणाले, समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना याच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यात येत आहे. माहिती कार्यालयाचा  संवादपर्व कार्यक्रम हा अत्यंत स्तुत्य असून याद्वारे आपणाला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून योजनांची माहिती होणार आहे. शासन विविध योजना राबवित असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. तावरे यांनी यावेळी केले.
           जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी माहिती कार्यालयाच्या कामकाजाची रुपरेषा सांगितली.   संवादपर्व कार्यक्रम राबविण्याचा उद्देश विस्तृतपणे सांगून समाजातील स्वयंसेवी संस्था, खेळाडू, कृषी विषयक उल्लेखनीय काम केलेल्या संस्था, उद्योजक  यांना माहिती कार्यालयाच्या वतीने प्रचारासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. शासकीय योजनांच्या प्रसिध्दीकरीता माहिती विभाग आकाशवाणी, दूरदर्शन, दूरचित्रवाणी, दिलखुलास कार्यक्रम, तसेच मासिक लोकराज्य या माध्यमांचा वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण तावरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार निलेश तावरे यांनी मानले.
0000


Post a Comment

 
Top