नवी दिल्ली ( वृत्त संस्था ) :-नवीन भारतात जातीयवाद, धर्मांधतेला स्थान नसणार; नवीन भारत सर्वांसाठी असणार आहे. नवीन भारतात महिलांना आपले स्वप्न पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य असेल. नवीन भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात म्हटले आहे.
काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहील, आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करतोय. बराच काळ मुख्यमंत्री राहिल्यानं देशातील विकासात राज्यांचं महत्त्व माहीत आहे. तरुणांना नोक-या मिळतील, तेव्हाच देशाची प्रगती होईल.

* गोळ्या किंवा शिव्यांनी नव्हे, तर काश्मिरींच्या गळाभेटीनंच जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* दहशतवादाविरोधात जगातील अनेक देशांची भारताला मदत- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* जम्मू-काश्मीरचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* जीएसटीमुळे व्यापार क्षेत्र मजबूत झालं- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* गोरखपूरमधील मुलांच्या मृत्यूप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दुःख
* प्रत्येक गावागावात वीज पोहोचवली आहे, देश प्रगती करतोय- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केलं, त्यावेळी भारताची ताकद जगाला मान्य करावी लागली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* गरिबांना लुटून तिजोरी भरणा-यांना आजही सुखाची झोप येत नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* देशातील अंतर्गत सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* चालतंय ते चालू द्या, हा जमाना गेला, आता बदल होतोय, जमाना बदलतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी
* नैराश्याला मागे टाकून आत्मविश्वासानं देशाची प्रगती साधायची आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* तरुणांना देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं भाग्य मिळतंय, तरुणांना देशाच्या विकासासाठी पुढे येण्याचं मी आवाहन करतो- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* 21व्या शतकात जन्मलेल्या तरुणांसाठी हे वर्षं महत्त्वपूर्ण आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी
* सुदर्शन चक्रधारी मोहनपासून चरखाधारी मोहन करमचंद गांधींपर्यंत देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी