Add

Add

0
                                
 पौड (प्रतिनिधी):- "आपण जसे बोलतो वागतो कृती करतो, तसा आपल्याविषय़ीचा संदेश समाजापर्यंत पोचतो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून चांगले जगण्याची संधी आहे. असे प्रतिपादन माजी आमदार मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद ढमाले यांनी मुळशी तालुक्यातील माले येथे केले".
ऑगस्ट क्रांतीदिनानिमीत्त माले येथील ऐतिहासिक सेनापती बापट स्मारक स्तंभावर आयोजित केलेल्या विशेष अभिवादन सोहळ्यात श्री.ढमाले बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अमराळे, माजी गटनेते शांताराम इंगवले, संस्थेचे संस्थापक रामचंद्र दातीर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुनिल चांदेरे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, टाटाचे माले विभागाचे प्रमुख दिलीप कवडे,राम गायकवाड,अंकुश तोंडे, प्रशांत जोरी,गणेश जोरी,विजय कानगुडे,विजय येनपुरे,रोहीदास केमसे,रमेश जोरी,दत्तात्रय सुर्वे, अऩिल आधवडे, माल्याचे उपसरपंच हनुमंत जनगाडे, नामदेव शेंडे,वसंत शेंडे, मोहन दातीर त्याचप्रमाणे संस्थेचे पदाधिकारी, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
ढमाले पुढे म्हणाले की सेनापती बापट यांच्यामुळे मुळशी तालुक्याचे नाव देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहीले गेले. त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा विदेशातही आहे. त्यामुळेच या विद्यालयाला विविध प्रकारच्या मदतीही जगभरातून होत असतात. अमराळे म्हणाले की रामचंद्र दातीर यांनी मुंबईत नोकरी करून माले ग्रामस्थांच्या मदतीने धरण भागातील मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. इंगवले म्हणाले की स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्याकाळातील युवकांमध्ये देशजागृती भिनली होती. आजचा तरूण मात्र ऐशआरामात फरफटत चालला आहे. तरूणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली पाहीजे. प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक रामचंद्र दातीर यांनी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास स्पष्ट केला. सूत्रसंचालन व आभार विजय दळवी यांनी मानले. यावेळी मुळशी धरण विकास मंडळाचे अध्यक्ष विजय कानगुडे आणि राष्ट्रवादीचे आंबवणे गणाचे अध्यक्ष विजय येनपुरे यांनी माले नाग्या कातकरी वसतिगृहासाठी तीन महिने पुरेल एवढे धान्य देण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे लिटल इंडीया संस्थेचे प्रमुख जयंत मंडलीक यांनी शाळेला प्रिंटर भेट दिला.
फोटोओळ - माले (ता.मुळशी) येथे ऐतिहासिक सेनापती बापट स्मारक स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करताना माजी आमदार शरद ढमाले

Post a Comment

 
Top