Add

Add

0
       मुळशी तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाढीसाठी कटीबध्द व्हा.. 

                   
पौड (प्रतिनिधी):-''राष्ट्रीय समाज पक्ष हा देशातील आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष असून पक्षाच्या कार्यक र्त्यॉंनी ग्रामपंचायती पासून विकास कामांचा पाठपुरावा करीत सर्व स्थरातील समाजाला एकसंघ बनवून ग्रामीण विकासाचा पाया घालावा,त्याचबरोबर पक्ष विस्तारासाठी कटीबध्द व्हावे असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे यांनी केले.मुळशी तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या तालुका पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी रा.स.पा.चे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब सुतार यांनी मुळशी तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकार्‍यांची घोषणा करून त्यांना मान्य वरांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
       राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुळशी तालुका नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे घोषीत करण्यात आले....
श्री.आप्पासाहेब सुतार-तालुका अध्यक्ष,मारूती गोरे-तालुका उपाध्यक्ष ,श्री.ज्ञानेश्वर आखाडे-तालुका सचिव, श्री.संजय कोकरे-सरचिटणीस,श्री.प्रकाश झोरे-सरचिटणीस,श्री.प्रकाश मरगळे-तालुका प्रसिध्दीप्रमुख,
रा.स.पा तालुका युवक अध्यक्ष-श्री.शिवाजी मरगळे, युवक उपाध्यक्ष-श्री.भाऊ गोरे, पौड-आंबवणे गण आध्यक्ष-श्री.कृष्णा आखाडे,उपाध्यक्ष-श्री.उमेश आखाडे ,श्री.तानाजी मरगळे-भोर,वेल्हा-मुळशी विधानसभा संपर्क प्रमुख.रा.स.पा.च्या या सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांना राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे,तालुका अध्यक्ष आप्पासाहेब सुतार,जिल्हा उपाध्यक्ष सचिन ढेबे,वेल्हा तालुका अद्यक्ष शंकर ढेबे,संदीप कुरवड,गणेश धनगर आदि मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.
  यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष आप्पासाहेब सुतार म्हणाले की,''मुळशी तालुक्यातील 'राष्ट्रीय समाज पक्षा ची वाढ करण्यासाठी सर्व समाजातील,सर्व स्थरातील कार्यकर्त्यांना सामावून घेत पक्ष बांधणीवर जोर देणार आहे.आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पद निवडणुक होणार असल्याने रा.स.पा.चा तालु क्यातील पहिला सरपंच देण्याचा निर्धार केला आहे.महिला,युवक,कामगार,शेतकरी यांना पक्षविस्तारामध्ये प्राधान्य देणार आहे.राज्य सरकारचा एक घटक पक्ष म्हणून काम करीत असताना ना.महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली समाजाभिमुख काम करण्याचा सर्वच कार्यकर्त्यॉंनी प्रयत्न करावा.’’पक्षाचे सरचि टणीस,उपाध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पत्रकार संघ मुळशीच्या ‘पौड पत्रकार भवन’येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  

Post a Comment

 
Top