Add

Add

0

          नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 मध्ये  मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती नियम लागू ... 

पुणे(प्रतिनिधी): -महाराष्ट्राच्या वाड्यावस्त्यांवरील राजकारण ढव ळून काढणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवड णुकीत आता आमूलाग्र बदल झाला आहे.सदस्यांमधून सरपंच निवडण्याऐवजी थेट मतदा रांतून सरपंच निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्या दृष्टी ने कायदेशीर सुधारणा केल्या आहेत.मतदारांतून निवडल्या जाणा ऱ्या सरपंचाला मुक्त चिन्ह घेऊनच निवडणूक लढवावी लागणार आहे.
भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यासह इतर राजकीय पक्षांसाठी राखीव असलेले चिन्ह घेता येणार नाही.त्यामुळे गावाच्या राजकार णात राजकीय पक्षांना नो एंट्री असणार आहे.
ऑक्‍टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत महाराष्ट्रातील चार हजार 120 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.ऑक्‍टोबरमध्ये राज्यातील 13जिल्ह्यांमधील 117 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांपासूनच जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. जनतेतून सरपंच निवडण्यासाठी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जनतेतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचाबाबत असलेले संभ्रम दूर करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वप्रथम सरपंचपदाच्या उमेदवारांना मुक्त चिन्हांच्या यादीतील चिन्हांचे वाटप होणार आहे. सरपंचपदाच्या उमेदवाराला वाटप करण्यात आलेली मुक्त चिन्ह गोठविण्यात येणार असून त्या गावातील प्रभागातील उमेदवारांना ते चिन्ह पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे आता गावात सरपंचाचे चिन्ह वेगळे आणि ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे चिन्ह वेगळे असणार आहे. सरपंचपदाच्या उमेदवारांना वाटप झालेल्या चिन्हानंतर शिल्लक राहिलेली चिन्हे ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवारांना वाटप केली जाणार आहेत. 
दरम्यान ,गावच्या सरपंचपदासाठी होणारी निवडणूक स्वतंत्र असल्याने पूर्वीच्या निश्चित जागेपेक्षा  ती अधिक जागा असणार आहे. पूर्वी सात जागा  असतील तर सरपंचपद धरून एकूण आठ जागा असतील  असे
 जाहीर  करण्यात आले आहे. 

Post a Comment

 
Top