Add

Add

0

पुणे (प्रतिनिधी):-येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येत असलेल्या नवीन प्रशा सकीय इमारतीची आज सकाळी पालकमंत्री गिरीष बापट यांनी पाहणी केली. नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या कामाविषयी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, अधिक्षक अभियंता राजेंद्र राहणे, कार्यकारी अभियंता बी. एस. बाविस्कर, उपअभियंता वर्षा सहाने, शाखा अभियंता विजय कुलथे, विद्युत उपअभियंता एन. एस. सुत्राने, विद्युत शाखा अभियंता टी. एन. थोपटे, खासगी वास्तुशास्त्रज्ञ सुनिल पाटील, कंत्राटदार विनय बडेरा उपस्थित होते.

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री गिरीष बापट यांनी नवीन इमारतीच्या प्रवेशव्दारात स्वागत टेबल लावावा, इमारतीमध्ये असणाऱ्या विविध विभागांच्या कार्यालयाची नावे व नकाशा ठळकपणे लावावा, इमारतीमध्ये असणाऱ्या सभागृहात महापुरुषांचे फोटो त्या सभागृहाच्या आकाराला साजेशे मोठे लावावे, इमारतीची आपत्कालीन व्यवस्था सक्षम बनवावी, ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवून एका कंट्रोल रूमची निर्मिती करावी, कामानिमित्त आलेल्या लोकांना ताटकळत बसावे लागू नये याची दक्षता घ्यावी, त्याच प्रमाणे पार्किंगची चांगली व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्याच प्रमाणे कामाचा दर्जा चांगला ठेवण्याबरोबरच कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या

Post a Comment

 
Top