Add

Add

0

    राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी

पुणे(प्रतिनिधी):-राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्य़ातील 12 तालुक्यांमधी
ल 222 ग्रामपंचायतींचा समावेश असून यंदा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमधील सरपंचपदासह अन्य सदस्य पदांच्या निवडणुकांसंबंधीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीमध्ये मुदत संपत असलेल्या 8 हजार पाचशे ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडणार आहे. त्यामधील नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या 7 हजार 576 ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्य़ातील 12 तालुक्यांमधील 222 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यातील पहिल्या टप्प्या मध्ये नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ११ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 211 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामपंचायत शाखेकडून देण्यात आली.या पाश्र्वभूमीवर 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी चारपासून जिल्ह्य़ात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 


Post a Comment

 
Top