Add

Add

0
                                       गायीनेही दिला टेस्ट टयूब बेबीला जन्म

पुणे (प्रतिनिधी):- आता टेस्ट टयूब बेबी ही संकल्पना मानवापुरतीच मर्यादित राहिली नाही. गायींसाठीचे टेस्ट टयूब बेबी तंत्र मुळशी तालुक्यातील भुकूम वृदांवन थारपारकर काऊ क्लबमध्ये यशस्वी झाले असून शुक्रवारी देशातील पहिल्या देशी वंशाच्या टेस्ट टयुब वासरू  जन्मला आले आहे. 
देशी गायींची संख्या वाढविण्यासाठी आयव्हीएफ तंत्रावर आधारित देशातील पहिला प्रयोगाची सुरूवात भुकूममध्ये 8 नोव्हेबर 2016 पासून करण्यात आली होती.जे.के.ट्रस्टने विकसीत केलेले हे तंत्र वृदांवन थार पारकर काऊ क्लबमध्ये सर्वात प्रथम वापरण्यात आले. याबाबत स्वःत जे. के. ट्रस्टचे डॉ. विजयपंत सिंघानिया यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रयोगाचा श्रीगणेशा करण्यात आला होता. 10 महिन्याच्या प्रयोग भुकूममील आधुनिक गोठ्यात यशस्वी झाला असून देशी वंश असलेले थारपारकर जातीचे वासरूाने जन्म दिला आहे. अशी माहिती वृदांवन थारपारकर काऊ क्लबचे अध्यक्ष चद्रकांत भरेकर यांनी दिली आहे. 
भूकूम येथील तीन थारपारकर गायींच्या गर्भाशयातील बीज जे.के.ट्रस्टच्या मोबाईल व्हॅनच्या तंत्राव्दारे नोव्हे बरमध्ये काढण्यात आले होते.योग्य तापमानात ठेवून प्रयोगशाळेत प्रक्रिया करून चांगल्या बैलाचे शुक्रजंतू वापरून गर्भ तयार करण्यात आला. या गर्भाचे रोपण दुसर्‍या गायींमध्ये करण्यात आले. प्रयोगशाळेत जन्माला आलेले वासरू हे मूळ थारपारकर मातेच्या जनूकरचनेनुसारच जन्माला आले आहे. हे पांढरेशुभ्र टेस्ट टयुब वासरू पहाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. 
देशातील पहिला प्रयोग भुकूममध्ये यशस्वी झाला असल्याचा आनंद व्यक्त करून क्लबचे अध्यक्ष चद्रकांत भरेकर पुढे म्हणाले की, भारतीय गोवंश सुधारण्याकरीता हे तंत्र क्रांतीकारक ठरणारे आहे. हे तंत्र महाराष्ट्रातील पशुपालकांच्या गोठ्यापर्यंत नेण्यासाठी आता आम्ही पोहचविणार आहोत. 
देशी गायीमधील दुर्मिळ होत असलेल्या थारपारकर जातीचे संवर्धन करून काऊ क्लब ही संकल्पना चंदक्रांत भरेकर यांनी भुकूूम येथे यशस्वी केली आहे. भारत-पाकिस्तान सिमेलगतच्या राजस्थानमधील थार वाळवंटातील प्रांतातून या गायीचे संवर्धन हा क्लब गेल्या पाच वर्षांपासून करीत असून यंदा क्लबमधील गाईच्या दूध, शेण आणि गोमूत्रापासून आयुवेर्दिक उत्पादन निर्मिती सुरू करण्यात आली आहे. केसांचे तेल, शरिराचे तेल, उदबत्ती,धूप, साबण, श्मापू, फेस क्रिम, बॉडी लोश, दंतमंजन आदी उत्पादने सुरू करण्यात आली आहेत. या उत्पादानाचे मॉडेल सुरू करण्यासाठी अनेक शेतकरी या क्लबला भेट देत असतात. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गाोकुळ मिशनचा कामधेनु राष्ट्रीय पुरस्काराने पहिल्याच वर्षी क्लबच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. 

छायाचित्र ओळ - वृदांवन थारपारकर काऊ क्लबमधील नवजात टेस्ट टयुब वासरू गायींसोबत 

Post a Comment

 
Top