Add

Add

0

हिंजवडी (प्रतिनिधी):-अज्ञात वाहनाने धडक दिल्याने संगणक अभियंता असलेल्या दुचाकीस्वार तरुणीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना हिंजवडी येथील लक्ष्मी चौकाजवळ घडली. गुरुवारी (ता. 31) सकाळी नऊच्या सुमारास वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर हा अपघात घडला. प्रतिभा मोहन तांबे (वय -27) असे या तरुणीचे नाव असून, ती येथील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील विप्रो कंपनीत नोकरीला होती. याप्रकरणी तिचे वडील मोहन गुलाब तांबे (वय-59,रा.थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचाल काविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

प्रतिभा ही गेल्या वर्षापासून विप्रो कंपनीत नोकरीला होती. ती नेहमीप्रमाणे कंपनीत जात असताना वेदांत सुपर मार्केटसमोर तिच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती रस्त्यावर कोसळली. या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी तिला हिंजवडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्‍टरांनी सांगितले. 


भरदिवसा अपघात घडूनही... 
प्रतिभाला धडक देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अज्ञात वाहनचालका विरूध्द गुन्हा दाखल केला असला तरी प्रतिभाला धडक दिलेले वाहन एवढ्या गर्दीत कुणीही कसे पाहिले नाही, किंवा पाहिले असल्यास पोलिसांना माहिती देण्यास कुणीही पुढे का येत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. भरदिवसा अपघात होऊनही वाहनचालक फरार झाला. त्याला पकडण्याची कुणीही हिंमत दाखविली नाही, अशी चर्चाही सुरू आहे.

Post a Comment

 
Top