Add

Add

0
जामगाव (प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यासारख्या अत्यंत ग्रामीण भागात मासिक शिवमार्गने दरवर्षी दसरा -दिवाळी अंक प्रसिद्ध करत ग्रामीण तरुणांनामध्ये  वाचनाची आवड निर्माण केली आहे. गेली आकरा वर्षे मासिक शिवमार्ग ने ग्रामीण भागात  शहरातुन प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकाच्या तोडीचा दसरा  अंक प्रसिद्ध करीत एक नवा आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज चे माजी अध्यक्ष व  विद्यमान संचालक रामचंद्र ठोंबरे यांनी केले . दत्तात्रय सुर्वे संपादित मासिक शिवमार्ग च्या दसरा -दिवाळी अंकाचे प्रकाशन दसऱ्याच्या निमित्ताने जामगाव येथे अत्यंत सध्या पद्धतीने करण्यात आले तेव्हा ते बोलत होते. 
शिवमार्ग दसरा-दिवाळी अंकाचे प्रकाशन जामगाव येथील भैरवनाथ मंदिरात करण्यात आले.यावेळी  जामगाव चे माजी सरपंच यशवंत मालुसरे,रामभाऊ कोंडीबा ठोंबरे,माजी उपसरपंच सोपं डोख ,पोलीस पाटील दत्तात्रय सुर्वे ,जामगाव  ग्रामपंचायतचे सदस्य लक्ष्मण ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते  गणपत बांदल ,दत्तात्रय ठोंबरे, श्रीराम सहकारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव सीताराम कंधारे,उपाध्यक्ष सौ .नंदा दत्तात्रय सुर्वे, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत सुर्वे ,चिंतामण सुर्वे,भाजप युवा मोर्चाचे योगेश मारुती सुर्वे,संतोष सुर्वे,नंदू मालुसरे, एकनाथ बांदल,शिवसेनेचे उपविभागप्रमुख बाळासाहेब सुर्वे ,दशरथ ठोंबरे, नामदेव मालुसरे ,शंकर मालुसरे, निवृत्ती सुर्वे, देवराम सुर्वे, आदी ग्रामस्थ व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सभासद,संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मासिक शिवमार्गचे संपादक दत्तात्रय सुर्वे यांनी या सर्व उपस्थितांचे स्वागत केले. 
 शिवमार्ग दसरा -दिवाळी अंक-2017 हा सुमारे 200 पानांपेक्षा जास्त पानांचा असून अत्यंत आकर्षक मुखपृष्ठ देण्यात आलेले आहे. हा अंक "सायकल विशेष"म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे.त्यामध्ये वाचकांसाठी सुमारे 14 वाचनीय कथा ,18 प्रतिष्टीत,नवोदित  लेखकांचे वाचनीय लेख आहेत.सायकल  विशेष विभागात 23 सायक लपट्टू, लेखकांचे सायकल विषयीचे अनुभव,प्रसंग,महत्व आणि इतर बराच काही देण्याचा प्रयत्न उल्लेखनीय असा आहे. प्रेरणा बँकेचे चेअरमन गुजर व बकुळ मावशी यांची मुलाखत ,30 कवींच्या मनोवेधक कविता, वात्रटिका ,चुटकुले,राजेंद्र सारंग ,अतुल पुरंदरे यांची व्यंगचित्रे या अंकाची वाचनाची गोडी वाढवतात. प्रत्येकाने वाचावा असा मासिक शिवमार्गचा दसरा -दिवाळी अंक-2017 झालेला आहे. 


Post a Comment

 
Top