Add

Add

0


पुणे(प्रतिनिधी):- दिवाळीचे औचित्य साधून 17 ऑक्टोबरला ‘धर्मसभा’ न्यासाच्या वतीने समाज मंदिर, बौद्ध विहार, गोसावी वस्ती, कोथरूड येथे गरजू महिलांसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. या वेळी सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी ‘न्यासाकडून घेण्यात आलेल्या या उप्रकामाचे कौतुक आहे. असे उपक्रम आमच्या प्रभागात नेहमी घेतले जावेत. न्यासाकडून घेण्यात येणाऱ्या अशा आणि अन्य उपक्रमांना माझे नेहमीच सहकार्य राहील’ असे मत व्यक्त केले. सौ. शोभा सरोदे, सौ. रुक्मिणी कांबळे, सौ. कुंदा राउत यांसह २५ गरजू महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
समाजाचा मुख्य घटक असलेल्या महिलांच्या गरजा पूर्ण होणे महत्त्वाचे असते; कारण महिला ही संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवणारी असते. तिच्याच जीवनावश्यक गरजा पूर्ण होत नसतील तर कुटुंबाचा निर्वाह होण्यास अडचणी निर्माण होतील असे आपण म्हणू शकतो. सक्षम महिला असलेल्या कुटुंबातूनच देशाचे हित साधणारी आदर्श पिढी निर्माण होते. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवन पद्धतीमुळे महिलांचे स्वत:च्या आयुष्याकडे दुर्लक्ष होते. विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने महिलेला विरंगुळा मिळतो. याच विरंगुळ्याचा आनंद गरजू महिलांना घेता यावा म्हणून दिवाळी सणाच्या निमित्ताने हा उपक्रम घेण्यात आला.

धर्मसभा’ न्यासाने व्यक्तीच्या पारमार्थिक उन्नतीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षालादेखील प्राधान्य दिले आहे. न्यासाच्या अंतर्गत नियमितपणे समाजसहाय्य आणि अध्यात्मप्रसार या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात येतात. लहान मुलांवर राष्ट्र, धर्म यांचे संस्कार व्हावे यासाठी ठिकठिकाणी बालसंस्कार वर्गही घेतले जातात. मुलांच्या गुणसंवर्धनावरही या वर्गात भर दिला जातो. यामुळे मुलांमध्ये होणारे चांगल्या पालटाविषयी पालकांनीही वर्गाचे वेळोवेळी कौतुक केले आहे. योग शिबिरे, जनजागृतीपर व्याख्याने, फळे वाटप, वह्या वाटप, विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधे वाटप शिबिरे, मंदिर स्वच्छता, तणावमुक्ती व व्यसनमुक्ती यांसाठी प्रबोधन करणे, विविध ठिकाणी गरजूंना अन्नदान, कपडे वाटप असे कार्यक्रम न्यासाकडून आयोजित केले जातात आणि त्याला समाजातून चांगला प्रतिसादही मिळतो.

Post a Comment

 
Top