Add

Add

0

पिंपरी (प्रतिनिधी ):- पिडीत व्यक्तींची मनोभावे सेवा करुन मानवता जोपासावी. ही साईबाबांची शिकवण आणि त्यांचा श्रध्दा, सबुरी हा मुलमंत्र आजही सर्व भारतीयांना मार्गदर्शक आहे. जाती, धर्म भेदभाव न मानता मानवासह सर्व प्राणीमात्रावर दया करावी. मानवाला माणुस बनण्याची शिकवण साईबाबांनी त्यांच्या आचरणातून दिली. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने श्री शिर्डी साई ग्लोबल फाऊंडेशन सामाजिक कार्य करीत आहे. हे अभिमानास्पद आहे असे मत
उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी व्यक्त केले.
श्री साईबाबा ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष निमित्त रविवारी (15 ऑक्टोबर 17) दिल्लीमधील श्री फोर्ट सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वेंकैया नायडू मार्गदर्शन करत होते. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, संस्थेचे अध्यक्ष चंद्रभानु सत्पती, डॉ. महेश शर्मा, केंद्रीय दक्षता आयुक्त के.बी. चौधरी, केंद्रीय मुख्य सुचना आयुक्त श्री दास आदींसह शिकागो, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, जर्मनी, मलेशिया, नेपाळ, मॅारीशस, कॅनडा, इंग्लड, फिनलंड, श्रीलंका येथील ट्रस्टचे प्रतिनिधी व विविध देशातील साईभक्त उपस्थित होते. यावेळी वेंकैया नायडू यांच्या हस्ते साईबाबांच्या जीवनावर आधारीत स्मरणिकेचे प्रकाशन आणि चंद्रभानु सत्पती यांचा करण्यात आला. 
     श्री साईबाबा ग्लोबल फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रभानु सत्पती म्हणाले की, 15 ऑक्टोबर 1918 रोजी 
विजयादशमीच्या दिवशी श्री साईबाबांनी शिर्डी येथे समाधी घेतली. भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी आणि साईबाबांचा मानवतेचा संदेश जगभर प्रसारित करण्यासाठी श्री साईबाबा ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये बंगाल सारख्या पूरग्रस्त भागात मदत कार्य करणे, देशभरातील उपेक्षित बालकांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे, जाती, धर्म भेदभाव न मानता मानवतेच्या दुष्टीकोनातून पिडीत व्यक्तींची सेवा करणे, मानवी जीवनस्तर उंचावण्यासाठी ही संस्था जगातील विविध देशात कार्यरत आहे. अशीही माहिती चंद्रभानु सत्पती यांनी दिली. 
-------------------------

Post a Comment

 
Top