Add

Add

0चिपळूण(धीरज वाटेकर):- महाराष्ट्रभर बीजारोपण,वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संमेलनासारखे अभिनव उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंड़ळ महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने येत्या 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असेलेल्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण संमेलन’ पार्श्वभूमीवर चिपळूण परिसरात, मंडळाच्या वतीने नुकतेच चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. पेठमापात झालेल्या चंदन रोप वाटप कार्यक्रमास नगरसेवक मनोज शिंदे, दत्तगुरु शेटये, करंजाई ढोल पथकाचे सदस्य हर्ष शिंदे, सौरभ आम्बुर्ले, अथर्व सागवेकर, दत्तगुरू शेट्ये, पप्पू महाडिक, शुभम संसारे, दुर्वांग होमकळस, पंकज तांबडे, निवळीचे विकास महाड़ीक उपस्थित होते. यावेळी शहरातील ‘गुरुकुल’ शैक्षणिक संकुलालाही चंदन चंदन रोपे भेट देण्यात आली. संस्थेचे संचालक संजय दरेकर, त्यांचे सहकारी महेश जठार, मुल्ला,तसेच प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष मनोज मस्के,संतोष सुर्वे,जाधव,विद्याधर अजगोलकर,कोदारे, उपस्थित होते. फारशी तिठा (पेढ़े) येथील रिक्षा यूनियनच्या सदस्यांनाही चंदन rope भेट देण्यात आली. यावेळी  rope  दत्ताराम लोकरे, संतोष सुर्वे, पारधी, काशीराम मोरे, सुनील चोपड़े, अनिल काणेकर,मयेकर, प्रकाश चोपड़े, पड़वेकर, भोसले, पेड़णेकर उपस्थित होते. गोवळकोट मधील स्थानिक तरुणांनी स्थापन केलेल्या ‘राजे सामाजिक प्रतिष्ठान’ यांनाही rope देण्यात आली. चालू मौसमात रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग सामाजिक पर्यावरण  प्रदूषण  निवारण  मंडळातर्फे, अध्यक्ष ‘वनमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, चंदनतज्ज्ञ वनश्रीमहेंद्र घागरे यांच्या सहकार्याने उपलब्ध होत असलेल्या चंदन रोपांचे, मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव-पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी वाटप केले. 

Post a Comment

 
Top