Add

Add

0

अमेरिकेतही दखल! radiochai.com वर दशक्रियाचा विशेष कार्यक्रम!
लवकरच जगभरात प्रदर्शन!
  मुंबई (राम कोंडविलकर):- 'शक्रिया' या बहुचर्चीत चित्रपटाने महाराष्ट्रातील रसिकांच्या पसंतीस खरे उतरत सर्वत्र 'हाऊसफुल्ल'चा पल्ला पार करीत महाराष्ट्रातील बहुतांश चित्रपटगृहांमध्ये नवी चेतना जागवीत 'सुपरहिट'चा किताब पटकावला आहे. महाराष्ट्रातील तमाम रसिकांनी या चित्रपटाला होणारा विरोध डावलून चित्रपटगृहात जाऊन नुसता चित्रपट पहिला नाही तर प्रसंगी ह्या चित्रपटाच्या खेळांसाठीचित्रपटगृह चालक-मालकयांची समजूत काढत हा चित्रपट दाखविण्याचा हट्ट धरला . 'दशक्रिया'वर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. त्यामुळे चित्रपटाच्या यशाचे खरे मानकरी हे मायबाप रसिक प्रेक्षक असल्याची भावना चित्रपटाचे दिग्दर्शक संदिप भालचंद्र पाटीललेखक बाबा भांडपटकथा, संवाद, गीत, प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटीलनिर्मात्या सौ. कल्पना विलास कोठारी, कार्यकारी निर्माता राम कोंडीलकर यांनी व्यक्त केले आहे.
‘दशक्रिया’ चित्रपटाबाबत होत असलेली चर्चा,त्याला मिळत असलेला रसिकांचा प्रतिसाद आणि चित्र पटाचा वेगळा विषय इत्यादी गोष्टींची चर्चा जगभरात सुरु असून त्याची दखल अमेरिके तील radiochai.com या रेडिओ वाहिनीने घेत दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा करून हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करण्याविषयीची मागणी केली असून तेथीलradiochai.com या रेडिओ वाहिनीवर ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या कथानकावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करून चित्रपटाची सविस्तर माहिती अमेरिकन आणि तेथील भारतीय नागरिकांना करून देण्याचा प्रयत्न काल केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार दिनांक 20– 21नोव्हेंबर रात्रौ. 9.30ते पहाटे 1.30 वाजता हा विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या दशक्रिया या चित्रपटाला जनसामान्य आणि दर्दी रसिकांमध्ये पाह ण्यासाठी मोठा उत्साह आहे. चित्रपटाच्या ट्रेलर काही मंडळींनी आक्षेप घेतल्याने झालेल्या गदारोळामुळे काही चित्रपट चालकांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार देत आपत्ती ओढून घेत नवा वादंग उभा केला होता, त्याला रसिकांनीच तोडीस तोड उत्तर देत हा चित्रपट सुरळीत चालू रहावा यासाठी विशेष प्रयत्न केले. सगळ्या माध्यमांनी ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत चित्रपटावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आणि एक दर्जेदार कलाकृतीला रसिकांपासून वंचित राहण्यापासून वाचविले असल्याची भावना निमित्ताने सर्वांनी बोलून दाखविली आहे.

विविध चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच 3 राष्ट्रीय व 11 महाराष्ट्र राज्य पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या  सौ.कल्पना विलास कोठारी यांच्या 'रंगनील क्रिएशन्सनिर्मित व संजय कृष्णाजी पाटील लिखित- प्रस्तुत आणि प्रदर्पणातच वेगळी चुणूक दाखविणाऱ्या दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' मध्ये धर्मश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या लुबाडणुकीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी सर्व जाती धर्माची माणसे एका पातळीवर कसे वावरतात याचं यथार्थ चित्रण या चित्रपटातून घडते. ‘दशक्रिया’ची मूळ कथा जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या राज्य पुरस्कार प्राप्त 'दशक्रियाया साहित्यकृतीवर आधारित आहे. 'दशक्रियाया चित्रपटातून आजच्या दांभिक समाजव्यवस्थेसोबतच वैचारिक जीवनाचं वास्तव दाखवीत जीवन आणि मरणाच्या दोन्ही बाजू प्रेक्षकांना पहायला मिळतात.

या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर,मनोज जोशी,अदिती देशपांडे,मिलिंद शिंदे,मिलिंद फाटक,उमा सरदेशमुख,अशा शेलार,नंदकिशोर चौघुले,संतोष मयेकर,उमेश मिटकरी,तसेच प्रथम पदार्पण करणारे बालकलाकार आर्या आढावविनायक घाडीगावकर यांच्यासह जवळपास 150 नवोदितांना अभिन याची संधी मिळाली असून विनोदी अभिनेते आनंदा कारेकरजयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.
जेष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश आणे यांनी 'दशक्रिया'चा कॅनव्हास जिवंत केला आहे. सह निर्माते नील कोठारी असून लाईन प्रोड्युसर मनाली कोठारी रायसोनी आहेत. आघाडीचे संगीतकार अमितराज यांचे संगीत चित्रपटाचे माधुर्य वाढविण्यात यशस्वी झाले असून स्वप्नील बांदोडकरबालशाहिर पृथ्वीराज माळीकस्तुरी वावरेआरती केळकरआरोही म्हात्रे यांनी स्वरांची उधळण केली आहे. नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले असून चंद्रशेखर मोरे यांनी कलादिग्दर्शन आहे. स्टोरीबोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव असून महावीर साबण्णवार यांनी सिंकसाऊण्ड डिझाईन केले आहे. रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी आकर्षक रंगभूषा केली असून वेशभूषा सचिन लोवलेकर यांची आहे. निर्मिती संकल्पना सौ.स्वाती संजय पाटील यांची असून सुनील जाधव यांनी संकलन केले आहे. पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडेयांनी दिले आहे तर स्थिर चित्रण किशोर निकम यांनी केले आहे. जनसंपर्कात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या राम कोंडीलकर यांनी 'दशक्रिया'ची कार्यकारी निर्मितीप्रसिद्धी व मार्केटिंगची जबाबदारी पहिली आहे.

Post a Comment

 
Top