Add

Add

0

              नावनोंदणी करण्याचे आवाहन

पिंपरी (प्रतिनिधी):- रोटरी क्लब ऑफ पिंपरी, प्राधिकरण, आकुर्डी आणि पिंपरी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीनंतर शहरातील मुलांना एक वर्ष शिक्षणासाठी मोफत परदेशी राहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन, रोटरी क्लबने केले आहे.
रोटरी यूथ एक्सचेन्ज या कार्यक्रमाअंतर्गत 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना जगातील विविध देशांमध्ये जुलै ते जून या कालावधीत एक वर्ष शिक्षणासाठी पाठविण्यात येते. तेथील राहण्याची, खाण्याची व शिक्षणाची सोय रोटरीतर्फे मोफत केली जाते. मुलांना आत्मविश्वास, परकीय भाषा ज्ञान, जगातील अनेक मित्र, वैचारिक आवाका अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांचा जबरदस्त व्यक्तिमत्व विकास होतो. तसेच जागतिक मैत्री आणि शांततेसाठी हा उपक्रम पूरक ठरत आहे. हा उपक्रम दरवर्षी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 तर्फे राबविला जातो.
या उपक्रमाची सविस्त माहिती देण्यासाठी रोटरीतर्फे परदेशी मुलांबरोबर पालक व विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  चिंचवड, थरमॅक्स चौक येथील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत हा मेळावा होणार आहे. मेळाव्याला प्रवेश मोफत असून नावनोंदणी अनिवार्य आहे.
नावनोंदणीसाठी विद्यार्थी व पाल्यांचे नावyepindia3131@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. तसेच अधिक माहितीसाठी उज्ज्वला जोशी यांच्याशी 9822413069 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top