Add

Add

0


पुणे, (प्रतिनिधी )– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील सांगवी भागात राहणारे संतोष नानासाहेब ढोरे सलग दुसऱ्यांदा विद्यापीठ निवडणुकीच्या पदवीधर मतदार संघातून रिंगणात उतरले आहेत. सध्या विद्यापीठ सिनेट सदस्य असलेले ढोरे दुसऱ्यांदा सदस्य होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ते एकमेव उमेदवार असल्यामुळे त्यांना पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील पदवीधर मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या अधिसभेच्या निवडणुका नवीन कायद्यानुसार पार पाडत आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवडणुकीला सुरूवात झाली आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या संस्था चालकांचे 6 आणि पदवीधर मतदारसंघातून 10 प्रतिनिधी विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून निवडून दिले जाणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील नावाजलेले विद्यापीठ असल्यामुळे अधिसभा निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक पिंपरी-चिंचवडसाठीदेखील खास ठरणार आहे. संतोष नानासाहेब ढोरे हे पिंपरी-चिंचवडमधील एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संतोष ढोरे हे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सध्या विद्यापीठाचे सिनेट सदस्य असलेले संतोष ढोरे दुसऱ्यांदा ही निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज आहेत.
विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून काम करताना संतोष ढोरे यांनी विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्यासाठी तसेच विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये त्यांना यशदेखील आले आहे. त्यामुळे आताच्या निवडणुकीत त्यांना विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पिंपरी-चिंचवडमधील एकमेव उमेदवार असल्यामुळे शहरातील सर्व पदवीधर मतदारांनी संतोष ढोरे यांना निवडून देण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे ढोरे यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.  

Post a Comment

 
Top