Add

Add

0


पिंपरी (प्रतिनिधी ) -  स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि वसुंधरा क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी, प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात तीन दिवसीय किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते शनिवारी (दि.11) झाले.  
यावेळी नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल, उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, नरहरी वाघ आदी उपस्थित होते.
महोत्सवाच्या उदघाटनानंतर पर्यावरणविषयक विविध लघुपट आणि अनुबोधपट प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थी आणि युवकांना केंद्रस्थानी ठेऊन महोत्सवात 'नदी वाचवा, जीवन वाचवा' ही संकल्पना ठेवण्यात आली असल्याचे रिकामे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता चैतन्य यांनी केले.
दरम्यान, या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेत सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन सावरकर सदनातील सभागृहात भरविण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top