Add

Add

0
असल्याचे नवीन अध्ययनातून निष्पन्न झाले आहे."

डेअरी व्यवसाय, पशु व्यापार, खाटीकखाने आणि चर्मोद्योगांच्या ऍनिमल ईक्वालिटी (Animal Equality) द्वारा केलेल्या राष्ट्रव्यापी संशोधनात पशुकल्याण, पर्यावरण, अन्नसुरक्षा आणि मानवाधिकार बाबतच्या कायद्यांचे सर्रास आणि राजरोसपणे होत असलेले उल्लंघन उघडकीस आले आहे.
26 नोव्हेंबर, पुणे, भारत - आजच्या दूध दिनानिमित्त, "डेडली डेअरी"(Deadly Dairy) नामक माहितीपटाद्वारे धक्कादायक क्रौर्य आणि यातना उघडकीस आणण्याचे काम "ऍनिमल ईक्वालिटी" (Animal Equality) ह्या पुणे स्थित प्राणी सुरक्षा संघटनेने केले आहे.
संघटनेच्या कार्यकारी संचालिका, श्रीमती अमृता उबाळे म्हणाले "शाकाहार इतका रूढ असलेल्या आपल्या भारतात, बहुतेकजण क्रौर्य आणि हिंसेचे केवळ मांसाहाराशीच नाते जोडतात. परंतु ह्या माहितीपटा द्वारेआम्ही डेअरी व्यवसायातील क्रौर्यच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या फायदेशीर नसलेल्या प्राण्यांचे गोमांस आणि चर्मोद्योगासाठी होत असलेल्या हत्येलाही डेअरी उद्योग कसा जबाबदार आहे हे दाखवून दिले आहे. हा उद्योग त्यातील कामगार, पर्यावरण आणि कृत्रिम हार्मोन्स कोंबून उत्पादन केलेल्या दूधाच्या ग्राहकांनाही हानिकारक आहे."
ह्या संघटनेने भारताच्या उत्तरेकडे- हरियाणा पंजाब, दक्षिणेकडील- हैद्राबाद, सिकंदराबाद, केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक, पूर्वेला- उत्तरप्रदेश आणि पश्चिमेत- महाराष्ट्र आणि गुजरात मधील अनेक लघु, मध्यम आणि मोठ्या डेअऱ्यांचे संशोधन केले. 2015च्या ऑक्टोबर मध्ये सुरु झालेल्या ह्या विस्तृत संशोधनात107 डेअऱ्या,2 वीर्य संचय केंद्र,11 पशु बाजार, 8खाटीकखाने, 7 मांसबाजार आणि 5 चर्मोद्योगकेंद्रांचा समावेश होता.
संपूर्ण अहवाल: http://bit.ly/2mRtJjz
व्हिडियो:  http://amzn.to/2zpwFZm
फोटो:  http://bit.ly/2hMwQnz


प्राण्यांच्या प्रजननापासून ते आर्थिक दृष्ट्या फायदेशीर नसलेल्या प्राण्यांच्या हत्त्येपर्येंत दुग्धोत्पादनातील प्रत्येक टप्प्यातील क्रौर्याचा चित्तथरारक तपशील श्रीमती उबळे सादर करतात. ह्या क्रूर चालीरीती शहरी वा

ग्रामीण, सगळ्याच प्रकारच्या डेअऱ्यांमध्ये रूढ असल्याचे त्या सांगतात.
पशु कल्याण
1) आजच्या काळात डेअरी व्यवसायातील प्राण्यांचे प्रजनन नैसर्गिक मार्गाने होत नाही. ह्या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या डेअरी व्यवसायांतील 100% व्यवसाय कृत्रिम रेतनाचा वापर करत असल्याचे आढळून आले. ह्यात लहान मोठे सगळेच व्यवसाय होते. वीर्य संचय केंद्रांत नर प्राण्यांचा काही इतर सालस केलेल्या नरां सोबत बळजबरीने संभोग घडवला जातो. ह्या सालस प्राण्यांना "समागमाला प्रवृत्त करणारे" अश्या अर्थाने"टीझर" असे म्हणतात. त्यांना मारूनमुटकून सालस केलेले असते.
2) छळवणूक केलेल्या बैलांच्या वीर्याचे, माद्यांच्या गर्भाशयात रोपण केले जाते. ही प्रक्रिया बहुतांशी अन नुभवी कामगारांद्वारे, निकृष्ट दर्जाच्या साधनांनी आणि रोगट वातावरणात केली जाते. पशुदेहाची क्षमतासंपेपर्येंत ही कृत्रिम रेतनाची प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू ठेवली जाते.
3) सर्वेक्षणातील 100% व्यवसायांत बछड्यांना आपल्या मातेपासून दूर बांधून ठेवलेले होते. काही ठिकाणी तर दूध वाचवण्यासाठी जन्मानंतर लगेचच वासरांना वेगळे केलेले होते.
4) दुग्धोत्पादनास अक्षम असल्याने आणि वाढवण्यासाठी खर्चिक असल्याने डेअरी व्यवसायातील 100% नर वासरे खाटीकखान्यांना विकली तरी जातात किंवा उपाशी मरण्यास सोडली तरी जातात. आमच्या संशोधनात, ही पद्धती अगदी रूढ असल्याचे डेअरी व्यावसायिकांनी स्वीकारले आहे.
5) बछड्याचा विरहामुळे झालेल्या मानसिक तणावामुळे मातेचे दूध आटले तर मारलेल्या वासराच्या मृतदेहात भुसा भरून तींस भ्रमित केले जाते.
6) वासरांतील माद्यांना दुधाचे कृत्रिम सूत्र देऊन वाढवले जाते. त्याही पुढे आपल्या शोषित मातांप्रमाणे क्रौर्यचक्रात ढकलल्या जातात.
7) डेअरीतील प्राण्यांना शारीरिक व्यायाम अजिबात प्राप्त होत नाही. त्यांस आखूड दोरी अथवा साखळीने त्यांच्याच शेणामुतात डाम्बवून ठेवले जाते. प्राण्यांना शारीरिक हालचालीची अजिबात आवश्यकता नसल्याचे दावे करणारे काही डेअरी व्यावसायिक आहेत.
8) ह्या प्राण्यांना काठ्यांनी, साखळ्यांनी आणि लाथाबुक्यांनी मारले जाते. कृत्रिम रेतनाच्या प्रक्रियेत आणि इतर वेळीही कामगार गायींच्या संवेदनशील जनेंद्रियांत आणि गुदद्वारात बोटे व हात खुपसून अत्याचार करतात. कोणत्याही व्याख्येनुसार हे लैंगिक शोषणच आहे.
9) खर्च वाचवण्यासाठी कित्येक डेअरी व्यवसायिक योग्य गुरांच्या डॉक्टर शिवायच गुरांचा औषधोपचार करतात. बरेच पशु जखमांनी आणि रोगांनी यातनाग्रस्त आढळून येतात.
10) पूर्वी संपूर्ण दूध स्रवण बंद झाल्यावरच प्राणी खटकाला विकले जायचे परंतु वाढत्या स्पर्धे मुळे 1-2 लिटर दूध कमी झाल्या मुळेही असे केलेले आढळते.
11) केवळ शेती आणि दुग्धोत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या गुरांच्या बाजारात देखील प्राण्यांच्या कत्तलीसाठी विक्रीची परवानगी दिली जाते.
12) वाहतूक नियम 1978 कायद्या अंतर्गत एका ट्रक मध्ये केवळ 6 प्राणी न्ह्यायची परवानगी असूनही एकेका ट्रक मध्ये 30हुन अधिक प्राणी कोंबले जातात. प्राण्यांचा बंड हाणून पाडण्यासाठी त्यांच्या जानेंद्रियांत काठ्या खुपसणे किंवा डोळ्यांत मिरची पावडर घालणे किंवा शेपटी पिरगळने वगैरे सारखे क्रूर मार्ग अवलंबले जातात.
13) खाटीकखान्यात एका काप्यात प्राण्यांची हत्या यशस्वी होत नाही. प्राण्यांची मान पुन्हा पुन्हा चिरून मारताना अतिशय गंभीर यातना उद्भवतात. इतर प्राण्यांच्या डोळ्यांदेखत कत्तल करणे अगदी रूढ आहे. बऱ्याचदा जिवंत प्राण्यांचे कातडे सोलले जातानाही आढळून आले आहे.
14) केरळ मधील काही खाटीकखान्यांत बेशुद्ध पडे पर्येंत प्राण्यांच्या डोक्यावर हातोडीने पुन्हा पुन्हा आघात केला जातो. ह्या पद्धतीला इंग्रजीत "hammer slaughter" असे म्हणतात.
अन्न सुरक्षा..
1) उत्तर आणि पूर्वेकडील भागांत ऑक्सिटोसिनचा वापर सर्रास केला जातो. ऑक्सिटोसिन मुळे दुग्धोत्पादन वाढत असल्याचा गैरसमज आहे. वास्तवात मातृत्वाच्या मानसिक ताणातून गायीचे दूध वासराविना स्त्रवत नाही. ऑक्सिटोसिन केवळ स्नायू शिथिल करून दुधाची वाट मोकळी करून देते.
ऑक्सिटोसिन... बऱ्याचदा प्रसूतीसदृश वेदना उत्पन्न करते. त्याच्या नियमित वापराने प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेवर आणि आयुर्मानावर विपरीत परिणाम होतो. एवढेच नव्हे तर ऑक्सिटोसिन टोचलेल्या गुरांचे दूध पिल्याने मनुष्या तही हॉर्मोन्सचा समतोल बिघडण्याची शक्यता असते.
2) डेअऱ्यांचे तळ नेहमी शेणा मुताने भरलेले असतात. बऱ्याचदा जिवंत प्राण्यांमध्ये रोगांनी मेलेल्या प्राण्यांचे मृतदेहही अढळून येतात. असल्या रोगट आणि भयानक वातावरणातून दुग्धोत्पादन आणि संचय होतो.
३) "दोन त्रितीआऊंश भारतीय डिटर्जंट, कौस्टिक सोडा आणि पेंट मिश्रित दूध पितात" असे केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन म्हणतात. ते पुढे सांगतात की "भारतीय नियामक मंडळाने (FSSAI) 2011 साली केलेल्या सर्वक्षणानुसार, बाजारात विकल्या जाणाऱ्या दुधाच्या 68% दूध, मंडळाने घालून दिलेल्या मानकांमध्ये बसत नाही."
मानवाधिकारांचे उल्लंघन...

1) बालमजूर बंदी कायदा 1956च्या अंतर्गत 18वर्षां खालील मुलांना मजुरीवर ठेवणे बेकायदेशीर आहे. प्रत्येक चर्मोद्योगात आणि खाटीकखान्यात किमान एक बालमजूर काम करत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
2) इथे कामावर असलेल्या बाल तसेच प्रौढ मजूरांना तोटके वेतन दिले जाते, तसेच कामाचे योग्य वातावरण, आरोग्य सेवांसारख्या मूलभूत गरजाही पुरवल्या जात नाहीत.
3) कामाचे स्वरूपच असे आहे की रोगट जनावरांत काम करून क्षयासारख्या रोगांची लागण उद्भवते.
पर्यावरण ऱ्हास...
1) डेअरी, चर्मोद्योग आणि मांसव्यवसाय इतक्या वेगाने पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे  की काही तज्ञांनुसार पुढील एक दोन दशकांतच दुरुस्त नं  होण्यासारखे नुकसान होऊ शकते.
3) केवळ प्रदूषणच नव्हे तर हे उद्योग प्रचंड पाणी वापरतात. पाण्याचा आपल्या देशात तुटवडा आहे.
"ऍनिमल ईक्वालिटी" (Animal Equality) संघटनेच्या कार्यकारी संचालिका, श्रीमती अमृता उबळे म्हणतात "वरवर जरी गुरं सुरक्षित वाटत असली तरी त्यांस प्रचंड दैनिक क्रौर्यातून जावे लागते. 15-20 वर्ष नैसर्गिक आयुष्य लाभलेले देह अत्याचारांमुळे 4-5 वर्षातच दम तोडू लागतात. ह्या सगळ्या निर्दयी चालीरीती प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960, वाहतूक नियम 1978 आणि खाटीकखाने नियम 2001 आणि उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांच्या अनेक आदेशांचे सरळ सरळ उल्लंघन आहेत."
संघटनेने डेअरी प्राणी कल्याण नियम लागू करण्याची सरकारला विनंती केली आहे. त्यांनी केलेल्या काही शिफारसी - डेअरी व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या स्थितीच्या देखरेखीकरता तज्ञ समितीचे गठण, डेअरी व्यावसाईक आणि शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, नर वासरांची कत्तल टाळण्या करता शुक्राणूंचे लिंगभेद करू शकणारे तंत्रज्ञान, स्वछतेचे कडक मानक आणि नियम, गुरांना बांधून ठेवण्यावर बंदी आणि चरण्यासाठी विशिष्ठ मोकळी ठिकाणे, ऑक्सिटोसिन प्रतिबंध, शिंग तोडणे, शेपूट मोडणे आणि गरम लोह्याने  शिक्का कोरण्यावर कडक बंदी, प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960 कायद्याच्या उल्लंघनाचा सध्याचा रु.50 दंड रु.20,000 वर वाढवणे इत्यादी.
श्रीमती उबळे पुढे म्हणतात "आज भारतात 32कोटींहून अधिक गुरे आहेत. ह्या प्राण्यांच्या यातना कमी करण्याच्या दृष्टीने कायदे नियम करणे कोणत्याहीप्रगतिशील राष्ट्राची मूलभूत गरज आहे. भारताने त्यातकमी पडणे योग्य नाही"संस्थेनी असहाय्य डेअरी जनावरांच्या हितासाठी  01130453618 वर मिस्ड कॉल देऊन आपला पाठिंबा दर्शवण्याचे आव्हान केले आहे.
संपादकीय नोंदी:
- "ऍनिमल ईक्वालिटी" (Animal Equality) प्राणी सुरक्षा संघटना असून ती मनुष्येतर प्राण्यांच्या यातनारहित समाजासाठी लढत आहे. एकूण समाज, कंपन्या आणि राजकारण्यांना प्राण्यांच्या दृष्टीने अधिक दयाळू आणि संवेदनशील बदल स्वीकारण्यास प्रेरित करण्याचे काम ऍनिमल ईक्वालिटी करते.

- ऍनिमल ईक्वालिटीने आज पर्येंत केलेल्या अनेक विधायक कामांपैकी उल्लेखनीय म्हणजे गुरांच्या बाजारात मांसाहारासाठी केलेल्या प्राण्यांच्या विक्रीवर राष्ट्रव्यापी बंदी, फोईग्राच्या आयातीवर आणि बैल शर्यत आणि बैल झुंजी सारखे बैलांचा करमणुकीसाठी केलेल्या वापरावर बंदी, भारत -नेपाळ सीमेवरील बळीच्या प्राण्यांच्या वाहतुकीवर बंदी, अपघातापासून हत्तींच्या संरक्षणार्थ विकसित केलेल्या रडार सेन्सिंगतंत्रज्ञानात उपदेश इत्यादी.

Post a Comment

 
Top