Add

Add

0

पुणे(प्रतिनिधी):-'पीएसआय बॉण्ड फार्मा स्टुडंट अँड इंडस्ट्री बिझी नेस ऑपर्च्युनिटी इन न्यू डोमेन'स्पर्धेमध्ये समीर मुजावर याला तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. बी.एम. रेड्डी कॉलेज ऑफ फार्मेसी, बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात 'मिलेनियल फार्मा स्टुडंट्स कॉंग्रेस' मध्ये तो सहभागी झाला. 
समीर मुजावर हा महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या 'अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी' मध्ये बी. फार्मसी च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. 
'भारतीय फार्मा 2018' च्या राष्ट्रीय स्तरावरील पुढच्या फेरीत मुजावर अल्लाना फार्मसी महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. फार्मा उद्योगांसाठी फायदेशीर असलेल्या 'पॅकेजिंग आणि तंत्रज्ञाना'शी संबंधित संकल्पना आणि कल्पना सादर करण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी दिली. 
'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'चे अध्यक्ष पी.ए.इनामदार, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी समीर मुजावर चे त्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले. 
समीर मुजावार 'भारतीय फार्मा 2018' च्या दरम्यान 'लो कॉस्ट एरोसॉल्स' विषयीच्या संकल्पनेचे प्रत्यक्ष मॉडेल सादर करणार आहे.

Post a Comment

 
Top