Add

Add

0
सिमला (प्रतिनिधी))- हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 9 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबर रोजी जाहीर कर ण्यात येणार आहे. दरम्यान गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचा एक्झिट पोल इंडिया टुडे- एक्सिसने जाहीर केला.  
हिमाचल प्रदेशच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार येथे काँग्रेस सत्तेतून पायउतार होईल, असा अंदाज वर्तविला आहे. इंडिया टुडे- एक्सिसच्या अंदाजानुसार भाजपला 47 ते 55 जागा मिळतील. तर काँग्रेसला केवळ 13 ते 20 जागावर समाधान मानावे लागेल, असे अंदाजातून दिसून येत आहे.
हिमाचल प्रदेशातील 68 विधानसभा जागांसाठी 9 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते.तर गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्पा आणि अखेरच्या टप्प्यासाठी गुरूवार दि. 14 रोजी  मतदान झाले. या दोन्ही निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.  

Post a Comment

 
Top