Add

Add

0

      माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन


पिरंगुट (प्रतिनिधी):- येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुळशी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सविता पवळे आणि सरपंच मनीषा पवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. गौतम पिसे, उपप्राचार्य रामदास कुसाळकर, ग्रामपंचायत सदस्या मंदा पवळे, माजी उपसरपंच अंकुश नलावडे, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य संतोष दगडे आदी उपस्थित होते.
इयत्ता पाचवी ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारावी अशा दोन गटात याचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञात प्रदर्शनात सुमारे इयत्ता 5 वी ते 8 वी गटात 265 आणि 9 वी ते 12 या गटात 300 असे एकूण 565 प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. शाळा पातळीवर आणि तालुका पातळीवर असे प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले. मुळशीतील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कुल, न्यू इंग्लिश स्कुल घोटावडे, मामासाहेब मोहोळ विद्यालय मुठा, न्यू इंग्लिश स्कुल शेरे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड व न्यू इंग्लिश स्कूल कोळवण शाखेतील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचत, वाहतूक दळणवळण, आरोग्य, गणितीय प्रतिकृती, स्मार्ट सिटी प्रकल्प, सोलर चार्जर मोबाइल कव्हर, व्हक्‍यूम क्‍लिनर, वॉटर अलार्म, मागनेटिक इंडक्‍शन, ह्युमन रोबोट, हायड्रोलिक जेसीबी, संरक्षक बूट, फवारणी यंत्र, वॉशिंग मशीन आदी प्रकल्प सादर केले होते. परीक्षण व्ही. एस. शिंदे, पी. ए. इनामदार, एस. डी. मोहोळ यांनी केले.

  • प्रदर्शनातील तालुका पातळीवरील विजेते पुढीलप्रमाणे :
    इयत्ता 5 वी ते 8 वी : प्रथम क्रमांक -साईराम बच्छाव वाघचौरे (श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड). द्वितीय क्रमांक -अनिकेत संजय सातपुते (मामासाहेब मोहोळ विद्यालय शेरे), तृतीय क्रमांक-आदित्य युवराज मोहोळ (मामासाहेब मोहोळ विद्यालय मुठा).
    इयत्ता 9 वी ते 12 वी : प्रथम क्रमांक -हर्षल तुकाराम कांबळे (पिरंगुट इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज), द्वितीय क्रमांक -राहुल सुभाष दुडे (न्यू इंग्लिश स्कूल कोळवण), तृतीय क्रमांक -स्नेहल दत्तात्रय तापकीर (न्यू इंग्लिश स्कुल घोटावडे).
  • प्रदर्शनातील शाळा पातळीवरील विजेते :
    इयत्ता 5 वी ते 8 वी : थम क्रमांक -तन्वी अर्जुन बग्गर, द्वितीय क्रमांक -अथर्व अनिल आहेर, तृतीय क्रमांक -साईराज यशवंत अमराळे.
    इयत्ता 9 वी ते 12 वी : प्रथम क्रमांक -हर्षल तुकाराम कांबळे, द्वितीय क्रमांक -प्रथमेश पांडुरंग तोंडे, तृतीय क्रमांक -अदनान उदरीस शाह.

Post a Comment

 
Top