Add

Add

0

थेऊर(प्रतिनिधी):-हवेली तालुक्‍यांतील 59 गांवच्या पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती हवेलीच्या उपविभागीय महसूल अधिकारी ज्योती कदम यांनी दिली. यांमध्ये आरक्षणनिहाय 29 महिला पोलीस पाटीलपदी विराजमान झाल्या आहेत. तालुक्‍यांतील 59 गावातील पोलीस पाटीलपदे रिक्त झाली होती. नैसर्गिक आपत्ती आणि घडलेल्या अतितात्काळ घटना पोलीस आणि महसूल प्रशासनास कळवण्याचे काम पोलीस पाटलांचे असल्याने या दोन्ही प्रशासनांमधील दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ही पदे भरण्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी लेखी, तर 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधींत तोंडी परीक्षा घेण्यांत आली होती.

गांवनिहाय पोलीस पुढीलप्रमाणे..
रेश्‍मा संतोष कांबळे (थेऊर), प्रियंका श्रीकांत भिसे (कदमवाकवस्ती), संदीप रामलिंग थोरात (मामुर्डी), सुभाष अर्जुन चव्हाण (विठ्ठलनगर), मोहन रामदास कुंजीर (वळती), संगीता रवींद्र आखाडे (नांदोशी), कल्पना अर्जुन रायकर (पिंपरी सांडस), सोनाली सचिन शिवरकर (आळंदी म्हातोबाची), गणेश तानाजी सपकाळ (खानापूर), दादा दशरथ कुंभार (बुर्केगाव), चंद्रकांत भिमराव टिळेकर (भवरापूर), चंद्रकांत बापू टिळेकर (माळीनगर), संतोष रामदास डिंबळे (कल्याण), कैलास शामराव कोतवाल (अष्टापूर), सीमा प्रल्हाद वारघडे (बकोरी), स्वप्नाली धर्मेंद्र गायकवाड (गावडेवाडी), सोनाली तुषार मुरकुटे (मुरकुटेनगर), स्वाती नितीन गायकवाड (वडकी), अनिता विकास मुजूमले (कोंढणपूर), सुप्रिया रितेश जोरी (मालखेड), वर्षा सचिन कड (कोरेगावमूळ), योगिता शकंर खाटपे (मोरदरवाडी), गौरी मारुती चव्हाण (सोनापूर), वृषाली उमेश आव्हाळे (आव्हाळवाडी), संदीप मारुती घोगरे (आर्वी), सागर जिजाबा गोते (बिवरी), हृषीकेष प्रकाश मते (खडकवासला), मिलींद मच्छिंद्र कुंजीर (कुंजीरवाडी), संजय नानासाहेब शिंदे (श्रीरामनगर), विजय गोविंद टिळेकर (टिळेकरवाडी), दत्तात्रय किसन चौधरी (पेठ), युवराज जयसिंग चोरघे (रहाटवडे), चंद्रसेन बापू टिळेकर (माळीनगर – देहू), कालीदास तुकाराम माताळे (गोऱ्हे खुर्द), विशाल अकुंश कदम (पेरणे)
हवेलीतील कोलवडी साष्टे, वाघोली, वाडे बोल्हाई आदी गावांतील निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने त्या गावातील पोलीस पाटील नियुक्ती जाहीर केली नाही. त्याचप्रमाणे पेठ, श्रीरामनगर, बिवरी आणि रहाटवडे येथील उमेदवारांना समान गुण मिळाल्याने पोलीस पाटील वारस पुरावा, रहिवास पुरावा, माजी सैनिक पुरावा, जन्म दाखला या कागदपत्रासह14 डिंसेबरला कार्यालयात बोलावल्याचे हवेलीच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top